Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Waterways Network: तुमचा प्रवास स्वस्त होणार! युरोपसारखं जलमार्गांचं जाळं देशभर तयार होणार, मास्टर प्लॅन रेडी

waterways transportation india

Image Source : www.theweek.in

पुढील 25 वर्षांसाठी म्हणजेच 2047 पर्यंत जलमार्गांच्या विकासासाठी 35 हजार कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करणार आहे, अशी माहिती इंनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संजय बंडोपाध्याय यांनी दिली. भारतीय नद्यांतून बोटी, जेट्टीद्वारे प्रवास वाढवण्यासाठी नदीमार्ग विकसित करण्यात येणार आहेत.

Waterways Network India: येत्या काही वर्षांमध्ये युरोपात जसं जलमार्गांच जाळं उभं राहिलं आहे, तसं जलवाहतुकीचं जाळं भारतातही उभं राहणार आहे. स्वस्तात मस्त नदीमार्गाने तुम्ही प्रवास करू शकता. हा प्रवास रस्ते, विमान आणि रेल्वेच्या प्रवासापेक्षाही तुम्हाला कमी पैशात होऊ शकतो. पुढील काही वर्षांमध्ये भारतातील नद्या प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने निधीची तरतूदही केली आहे.

पुढील 25 वर्षांसाठी म्हणजेच 2047 पर्यंत जलमार्गांच्या विकासासाठी 35 हजार कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करणार आहे, अशी माहिती इंनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संजय बंडोपाध्याय यांनी दिली. भारतीय नद्यांतून बोटी, जेट्टीद्वारे प्रवास वाढवण्यासाठी नदीमार्ग विकसित करण्यात येणार आहेत. येत्या शुक्रवारी देशातील  सर्वात लांब रिव्हर क्रूझचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याचेही ते म्हणाले.

बांगलादेश भारताला  जोडणारा सर्वात लांब जलमार्ग(Longest water way India)

भारत बांगलादेशला जोडणाऱ्या सर्वात लांब जलमार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. हा जलमार्ग 3 हजार 200 किलोमीटर लांबीचा आहे. गंगा-ब्रम्हपुत्रा-हुगळी, Indo-Bangladesh Protocol (IBP) आणि ब्रम्हपुत्रा नदीचा या जलमार्गात समावेश आहे. या जलमार्गाद्वारे प्रवासी आणि मालाची वाहतूक केली जाणार आहे.

या जलमार्गाद्वारे उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि आसाम राज्ये एकमेकांना जोडली जाणार आहेत. या मार्गावरील पहिल्या क्रूझचे पंतप्रधान मोदी उद्घाटन करणार आहेत. स्वित्झर्लंड देशातील 32 प्रवाशांना घेऊन बोट निघणार आहे. उत्तर-प्रदेशातील वाराणसी येथून बोट निघेल आणि आसाममधील दिब्रूगड येथे शेवटच्या ठिकाणावर थांबेल.

भविष्यात काय आहे योजना (waterways transportation Plan India)

उत्तर भारतातील नद्यांसोबतच दक्षिण भारतातील नद्यांचाही जलमार्गासाठी विकास करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिक, पर्यटक आणि मालवाहतुकीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. 80 ठिकाणे दिडशेपेक्षा जास्त बोटींनी जोडण्यात येणार आहेत. उत्तर भारतातील इंडिया बांगलादेश प्रोटोकॉल जलमार्गावरील मोंगला, बरिसाल आणि नारायणगंज ही ठिकाणे एकमेकांना जलमार्गाने जोडण्यात येणार आहेत. खासगी क्षेत्रातील गुंतवणूकही मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्ये जलमार्गाने एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल, किनारी राज्यातील बॅकवॉटरचा जलमार्गात समावेश करण्यात येणार आहे.