Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cotton Export Stalled : कापूस निर्यात थंडावली, भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल

Cotton Export, MSP of Cotton, Cotton Price

Cotton Export Stalled : सध्या कापसाचे भाव कमी झालेले आहेत. यंदा कापसाच्या निर्यातीला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे देशांतर्गत बाजारात कापसाचे दर वाढले आहेत, आणखी वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे, त्यामुळे त्यांनी माल साठवून ठेवला आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या या लेखातून.

प्रमुख कापूस उत्पादक राज्यात नवीन कापूस पिकाची आवक सुरू झाल्याने भावात घसरण सुरू झाली आहे. कापसाचे क्षेत्र व उत्पादन वाढल्याने भावात घसरण होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे पावसामुळे पिकाचे झालेले नुकसान आणि इतर कापूस उत्पादक देशांतील खराब पीक यामुळे परकीय मागणी कापूस उत्पादक शेतकरी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात कापूस उत्पादन वाढण्याच्या अपेक्षेने भाव घसरायला सुरुवात झाली. त्यामुळे कोणकोणत्या बाबींवर परिणाम होणार, कपाशीचे भाव वाढणार की नाही? हे जाणून घेऊया या लेखातून. 

कापूस निर्यातीला फटका (Impact on Export)

यंदा कापसाच्या निर्यातीला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारात कापसाचे दर वाढले आहेत, आणखी वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे त्यामुळे त्यांनी माल साठवून ठेवला आहे. त्यामुळे बाजारात अपेक्षित आवक होत नाही स्थानिक बाजारात दर चढे असल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींच्या तुलनेत भारतीय कापूस 5 ते 6 %  महाग असल्याने सध्या निर्यात बंद आहे.  

बाजार विश्लेषकांचे काय म्हणणे आहे? (Expert View's)

बाजार विश्लेषकांनी सांगितले व्हिएतनाम आणि बांग्लादेशमधील खरेदीदारांनी अमेरिकेतून कापूस घ्यायला सुरुवात केली, कारण भारताच्या कापसापेक्षा तो कापूस त्यांना स्वस्त पडत आहे. दरवर्षी  ऑक्टोंबर ते जानेवारी या चार महिन्यात भारतातची कापूस निर्यात जोरात असते. एकूण कापूस निर्यातील पैकी 60 ते 70 टक्के कापूस या काळात निर्यात होत असतो. पण यावर्षी  परिस्थिती वेगळी आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सीसीसीआयचे अध्यक्ष अतुल गणत्रा (Cotton Association of India is CCCI President Atul Ganatra)यांनी सांगितले. कापूस निर्यातीत 30 टक्के घट होण्याची शक्यता आहे यंदा 43 लाख गाठी कापूस निर्यात होईल असा सीसीसीआयचा अंदाज आहे. 

निर्यातदारांच्या मते… 

काही निर्यातदारांच्या मते मात्र कापूस निर्यातीत इतकी घट होणार नाही, निर्यात किमान गेल्या वर्षी इतकी राहील किमान किंचित जास्त राहील असे त्यांचे म्हणणे आहे. यंदा निर्यात 45 ते 48 लाख गाठी होईल असेही त्यांनी सांगितले आहे. त्यांनी  केलेल्या सर्वेक्षणानुसार गुजरात आणि महाराष्ट्रात कापसाची स्थिती चांगली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस साठवून ठेवला आहे.  दरवाढ झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बाजारात कपाशीची आवक वाढेल.  काही व्यापारी सूत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार गुजरातमध्ये निवडणुका संपल्यानंतर डिसेंबर पासून कापसाचे आवक पडायला सुरवात होईल तर महाराष्ट्र आणि तेलंगणात येत्या काही दिवसात आवक वाढेल.

2022-23 साठी कापसाचा एमएसपी (Cotton MSP)

संपूर्ण हंगामात एमएसपीपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी कापूस लागवडीकडे आकर्षित होत आहेत. केंद्र सरकारने 2022-23 साठी कापसाचा एमएसपी 6380 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. 2021-2022  मध्ये कापसाचा एमएसपी 5727 रुपये प्रति क्विंटल होता. एमएसपीमध्ये वाढ होऊनही बाजारात एमएसपीपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी वर्षभर खुल्या बाजारात आपली पिके विकत होते. देशांतर्गत बाजारात आवक सुरू झाल्यामुळे किमतीत थोडीशी घसरण नक्कीच होईल, असे जाणकारांचे मत आहे, परंतु ही घसरण फार काळ टिकणार नाही कारण जागतिक बाजारपेठेतून मागणीचा कल या दिशेने जाणार आहे.