Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

युरोपमधून Schengen Visa नाकारल्यामुळे भारतीयांचे 87 कोटींचे नुकसान!

Schengen VISA

Image Source : www.axa-schengen.com

Schengen Visa: 2022 मध्ये भारतातून शेन्जेन व्हिसासाठी तब्बल 6,71,928 लोकांनी अर्ज केला होता. त्यापैकी 1,21,188 लोकांचे व्हिसा अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामुळे भारतीयांचे 87 कोटींचे नुकसान झाले.

Visa Application Rejection: संपूर्ण जगभरातून 2022 मध्ये Schengen Visa नाकारण्यात भारताचा दुसरा क्रमांक होता आणि यामुळे भारतीयांचे तब्बल 87 कोटी रुपयांचे नुकसान झाले. काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्टमध्ये भयानक आकडेवारी समोर आली आहे. व्हिसा नाकारल्यामुळे मागील वर्षभरात अनेकांची सुट्टी वाया गेली होती आणि यामध्ये काही लोक नाही तर तब्बल 1 लाखाहून अधिक भारतीय होते. ज्यांचे शेन्जेन व्हिसाचे अर्ज नाकारण्यात आले होते. त्याची एकूण किंमत तब्बल 87 कोटीहून अधिक होती. 

शेन्जेन व्हिसाच्या बाबतीत अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, भारतातून एकूण 6,71,928 अर्ज शेन्जेन व्हिसासाठी पाठवण्यात आले होते. यासाठी एकूण 487 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यातील एकूण 1,21,188 व्हिसा अर्ज नाकारण्यात आले. एकूण अर्जापैकी नाकारलेल्या अर्जाचे प्रमाण 18 टक्के होते.

Schengen VISA नाकारण्याची कारणे काय?

शेन्जेन व्हिसा नाकारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात नेहमीची कारणे होते, असे सांगितले जाते. यामध्ये अपूर्ण व चुकीचे अर्ज, पुरेसा हेल्थ इन्शुरन्स नसणे, आर्थिक गोष्टींशी संबंधित पुरेशी कागदपत्रे नसणे, त्याचबरोबर काही चुकीच्या गोष्टी अर्जामध्ये आढळून आल्याने हे अर्ज नाकारण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

शेन्जेन व्हिसा म्हणजे काय?

Schengen Area किंवा शेन्जेन एरिआ हा युरोपमधील 27 देशांचा समूह आहे. या देशांना Schengen Area म्हटले जाते. या देशांनी मिळून आपल्यामधील सीमा काढून टाकल्या आहेत. शेन्जेन एरिआमध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, नेदरलॅण्ड, पोलंड, आणि स्कॅन्डिनेव्हियन देशांचा (उत्तर युरोपमधील देश) समावेश होतो. यामध्ये युके आणि आर्यलॅण्ड या देशांचा समावेश होत नाही.

Schengen Visa द्वारे युरोपमधील 27 देशांमध्ये राहण्याची परवानगी मिळते. या व्हिसाद्वारे परदेशी व्यक्ती इथे 180 दिवसांपैकी जास्तीत जास्त 90 दिवस राहू शकते. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, Schengen Visa साठी अर्जासोबत 80 युरो (आताच्या भारतीय चलनानुसार 7,264 रुपये) फी भरावी लागते. हा व्हिसा नॉन-युरोपिअन देशांमधील नागरिकांसाठी गरजेचा आहे. विशेषकरून अफ्रिका, रशिया, भारत आणि चीनमधून युरोपमधील या प्रदेशात जाण्यासाठी Schengen Visa लागतो.