Hydrogen for Heritage: भारतीय रेल्वे हेरिटेज हायड्रोजन अंतर्गत 35 हायड्रोजन ट्रेन चालवणार आहे. हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर हे हरित वाढीच्या दिशेने एक मोठे पाऊल असणार आहे. राज्यसभेत माहिती देताना, भारतीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वेने प्रति ट्रेन 80 कोटी रुपये आणि जमिनीच्या पायाभूत सुविधांसाठी 70 कोटी रुपये खर्चाच्या विविध हेरिटेज मार्गांवर हेरिटेज फॉर हायड्रोजन अंतर्गत 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. भारतीय रेल्वे 2030 सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ग्रीन विकास म्हणजेच हरित विकासाची संकल्पना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मांडली होती. शाश्वत विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत सरकार करणार असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या होत्या.
येणाऱ्या काळात हायड्रोजन ट्रेन्सचा होणार विस्तार
याशिवाय, भारतीय रेल्वेने 111.83 कोटी रुपये खर्चून विद्यमान डिझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (DMU) रेकवर हायड्रोजन इंधन सेलच्या रेट्रो फिटमेंटसाठी एक पायलट प्रकल्प तयार केला आहे. जी उत्तर रेल्वेच्या जिंद-सोनीपत सेक्शनवर धावण्याची योजना आहे. हा प्रकल्प 2023-2024 या आर्थिक वर्षात सुरू होण्याची अपेक्षा आहे. पपहिल्या टप्प्यात कालका-शिमला सारख्या हेरिटेज सर्किटवर हायड्रोजन ट्रेन धावेल. त्यानंतर इतर मार्गांवरही त्याचा विस्तार केला जाईल.
Indian Railways has envisaged running 35 #hydrogen trains under “Hydrogen for Heritage" at an estimated cost of ₹80 crores per train and ground infrastructure of ₹70 crores per route on various heritage/hill routes: @AshwiniVaishnaw in Rajya Sabha@RailMinIndia pic.twitter.com/CTBPXdJEIL
— INDIA NARRATIVE (@india_narrative) February 4, 2023
भारतीय रेल्वेने याआधी कधीही असा प्रयोग केलेला नाही. हायड्रोजन इंधनावर आधारित ट्रेनचा ऑपरेटिंग खर्च रेल्वेच्या अर्थसंकल्पात नमूद केलेला नाही. असा अंदाज आहे की हायड्रोजन इंधन असलेल्या ट्रेन-सेटची सुरुवातीची ऑपरेटिंग किंमत जास्त असेल जी नंतर गाड्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे कमी होईल. याव्यतिरिक्त, स्वच्छ ऊर्जा स्त्रोत म्हणून इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर शून्य कार्बन उत्सर्जन उद्दिष्टांना समर्थन देण्यासाठी हरित वाहतूक तंत्रज्ञानासाठी फायद्याची ठरणार आहे. भारतीय रेल्वेचे जाळे हे आशिया खंडातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात मोठे रेल्वेचे जाळे आहे. करोडो प्रवासी दररोज टरेल्वेने प्रवास करतात. इतर दळणवळणाच्या सुविधांचा विचार करता रेल्वे प्रवास अधिक स्वस्त आणि सुरक्षित मानला जातो.