उद्योग जगतासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय कंपन्यांसाठी ऐतिहासिक असा एक निर्णय घेतला आहे. भारतीय कंपन्या आता थेट परदेशी स्टॉक एक्सचेंज तसेच अहमदाबादमधील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) वर सूचीबद्ध होऊ शकतात, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. यामुळे आता लवकरच भारतीय कंपन्या परदेशातही लिस्ट होऊ शकतील आणि त्यांना परदेशी गुंतवणूकदार देखील मिळू शकतील. यामुळे कंपन्यांना गुंतवणुकीचे निरनिराळे मार्ग खुले होणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या या निर्णयाचे उद्योग जगताने आणि सामान्य गुंतवणूकदारांनी देखील स्वागत केले आहे.
या निर्णयाद्वारे भारत सरकार शहरांना त्यांचे रेटिंग अपग्रेड करण्यासाठी प्रोत्साहन देत असून जेणेकरून कंपन्यांना त्यांच्या रोख्यांसाठी चांगले मूल्य मिळू शकेल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. भारतीय कंपनियां विदेश में हो सकती हैं सूचीबद्ध निर्मला सीतारमण ने कहाhttps://t.co/n2s3qjjYXf#NirmalaSitharaman #FinanceMinister #Indiancompanies #AMC #DebtMarket #IFSC #News_Hindi_Channel #DRV_NEWS_HINDI #HINDI #हिंदी_न्युज #डीआरवीन्यूज_हिंदी_चॅनल #hindinews… pic.twitter.com/Hzzc6p2OWa
‘कोविड पॅकेज’ मध्ये झाली होती घोषणा!
खरे तर या निर्णयाची घोषणा अर्थमंत्र्यांनी कोविड पॅकेज जाहीर करताना केली होती. कोविडनंतर जगभरातील अर्थव्यवस्था प्रभावित झाली होती. या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने काही उपाययोजना आणल्या होत्या, त्यापैकी ही एक योजना केंद्र सरकारने मांडली होती. परंतु याबाबतच्या सर्व तांत्रिक अडचणी, शासकीय धोरणे यांचा विचार करता सदर निर्णय लागू करण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागला आहे.
जागतिक भांडवलाचा फायदा!
याबाबत सविस्तर बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, भारतातील कंपन्या आता परदेशी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केल्या जाऊ शकतील. यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर सर्व उपापयोजना केल्या जाणार आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना अधिक चांगल्या मूल्यमापन सुविधा आणि जागतिक भांडवलात प्रवेश मिळेल. तसेच त्यांना जगभरातून भांडवल उभे करता येणार आहे. याचा फायदा देशांतर्गत कार्यरत असलेल्या कंपन्यांना होईलच सोबतच देशाच्या आर्थिक विकासासाठी देखील हा निर्णय फायद्याचा ठरले असे त्या म्हणाल्या. येत्या काही आठवड्यात याबाबतचे नियम आणि अटी जाहीर केल्या जातील असेही त्यांनी सांगितले आहे.