नैसर्गिक आपत्ती, लष्करी संघर्ष व वैद्यकीय आणीबाणी या समस्यांमुळे परदेशात प्रभावित झालेल्या नागरिकांना सहाय्य देण्यासाठी सरकारने इंडियन कम्युनिटी वेलफेअर फंड (ICWF) निधीची उभारणी केली होती. इतर देशात काम करणारे कर्मचारी व गुप्तचर यांना या निधीची मदत घेता येते. अडचणीच्या परिस्थितीत हवाई मार्गाचा उपयोग केला जातो. यासाठी स्वतंत्र विमानाची व्यवस्था भारत सरकारला करावी लागते, यासाठी हा निधी आवश्यक आहे.
ICWF मार्फत मिळणारी मदत
1. मृतदेहांची वाहतूक आणि मरण पावलेल्या भारतीय नागरिकाच्या अंत्यसंस्कारासाठी खर्च
2. परदेशात संकटग्रस्त भारतीय नागरिकांसाठी निवास व्यवस्था उभारणे.
3. परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना हवाई मार्गाने देशात आणणे.
4. परदेशात भारतीय नागरिकांनी किंवा विद्यार्थ्यांनी गुन्हे किंवा किरकोळ गुन्हे केले असतील त्यांची पडताळणी करून न्याययाचिका दाखल करणे
5. अपघातात गंभीर वैद्यकीय परिस्थिती असलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या परदेशातील भारतीयांसाठी आपत्कालीन वैद्यकीय मदत.
या प्रकरणांमध्ये देखील भारतीयांना आर्थिक सहाय्य मिळते
- परदेशात संकटात सापडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत केली जाते.
- परदेशात वास्तव्यास असलेल्या महिलांना देखील या निधीद्वारे आर्थिक साहाय्य दिले जाते.
- सात वर्ष लग्नाला पूर्ण झाले असतील आणि परदेशात वास्तव्य असेल तर महिला यासाठी पात्र असतात.
अर्जाची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे
- परदेशात मरण पावलेल्या भारतीय नागरिकांसाठी भरपाईसाठी दावा केलेला अर्ज
- अर्जाची प्रक्रिया आणि नुकसानभरपाईच्या दाव्यांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे देशानुसार बदलतात. ही माहिती अधिकृत लिंकवर मिळू शकते
आवश्यक कागदपत्रे
1. मृत्यु प्रमाणपत्र
2. मृत व्यक्तीचे बँक तपशील
3. मृत व्यक्तीचा विमा क्रमांक
4. विवाह प्रमाणपत्र (पती / पत्नी) आणि जन्म प्रमाणपत्र(मुलांचे)
5. फोटोकॉपीसह मृत व्यक्तीचा मूळ पासपोर्ट
6. कायदेशीर वारस प्रमाणपत्र, संबंधित तालुका/तसीलदार यांच्यामार्फत किंवा भारतातील संबंधित क्षेत्राच्या जिल्हा दिवाणी न्यायालयामार्फत जवळच्या नातेवाईकांनी मिळवणे.
7. मृत्यू प्रकरणावर अवलंबून असलेले इतर कोणतेही दस्तऐवज, जसे की पोलिस अहवाल (स्थानिकपोलिसांकडून), वैद्यकीय अहवाल (रुग्णालयातून)
8 . इतर वारसांकडून एनओसी (एकाहून अधिक वारसांच्या बाबतीत)