चांगली मागणी आणि नवीन ऑर्डर्समध्ये घेतलेली झेप यामुळे डिसेंबरमध्ये भारतातील उत्पादन क्षेत्र (manufacturing activity) 13 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. मासिक सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. हंगामी S&P ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) नोव्हेंबरमध्ये 55.7 वरून डिसेंबरमध्ये 57.8 वर पोहोचला. गेल्या दोन वर्षांतील व्यवसायातील सर्वात मोठ्या तेजीमुळे हे घडले आहे.
डिसेंबरच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की सलग 18 व्या महिन्यात एकूण ऑपरेटिंग परिस्थितीत सुधारणा झाली आहे. परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) मध्ये 50 च्या वरचा आकडा विस्तार दर्शवतो तर 50 पेक्षा कमी आकडा आकुंचन दर्शवतो.
S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या असोसिएट डायरेक्टर पॉलीआना डी लिमा म्हणाले, “2022 ची सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवातीपासून उत्पादन क्षेत्राने चांगली कामगिरी कायम ठेवली आहे. नोव्हेंबर 2021 पासून या वर्षाच्या अखेरीस पीएमआय सर्वात वेगवान ठरले आहेत. या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, डिसेंबरमध्ये नोकरभरतीची कामे मोठ्या प्रमाणात होती. त्याचबरोबर कंपन्यांनी त्यांची साठवणूक वाढवण्यासाठी चांगली खरेदी केली. "डिसेंबर 2017 मध्ये चांगल्या मागणीमुळे विक्रीत चांगली वाढ झालेली बघायला मिळाली"
"पुरवठा साखळी विषयक आव्हाने आता कमी झाली आहेत, ज्यामुळे उत्पादन वाढले आहे," अस लिमा म्हणाले. या अहवालात म्हटले आहे की निर्यातीच्या बाबतीत डिसेंबरमध्ये नवीन ऑर्डरची गती गेल्या पाच महिन्यांतील सर्वात कमी आहे. कंपन्यांना प्रमुख निर्यात बाजारातील ऑर्डरमध्ये घट दिसून आली आहे.
नोव्हेंबरच्या तुलनेत चलनवाढीच्या दरात किरकोळ फरकासह डिसेंबरमध्ये महागाई आघाडीवर खर्चाचा प्रेशर जवळजवळ स्थिर राहिला, असे अहवालात म्हटले आहे. S&P ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग PMI 400 उत्पादकांच्या खरेदी व्यवस्थापकांकडून मिळालेल्या प्रतिसादांच्या आधारे S&P ग्लोबलने तयार केले आहे. नवीन वर्षात उत्पादनाचा दृष्टीकोन कंपन्यांसाठी सकारात्मक आहे, असे अहवालात म्हटले आहे.