• 04 Oct, 2023 12:52

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone Production in India: भारतात बनणार iPhone निर्मितीचे केंद्र, 'Make in India' ला अॅपल कंपनीचा प्रतिसाद

iPhone Manufacturing in India

iPhone Production in India: 2027 पर्यंत प्रत्येक दोन आयफोनमधील एकाची निर्मिती भारतात झालेली असेल, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. मागली वर्षी एप्रिल ते डिसेंबर या फक्त नऊ महिन्यांच्या काळात अॅपल कंपनीने भारतामध्ये सुमारे अडीच बिलियन डॉलर किंमतीचे मोबाइल तयार केले. भारतामध्ये मोबाइल निर्मितीसाठी अॅपलने 2022 मध्ये सुरुवात केली.

अमेरिकेतील बलाढ्य कंपनी अॅपलने आयफोन निर्मितीसाठी भारताला प्राधान्य दिले आहे. मागील काही वर्षांपासून आयफोनची सर्वाधिक निर्मिती चीनमध्ये होते. मात्र, कोरोना आणि जागतिक मंदीमुळे चीनमधून अॅपल आपली गुंतवणूक काढून घेत आहे. 2027 पर्यंत प्रत्येकी दोनपैकी एका आयफोनची निर्मिती (iPhone Production in India) भारतात होईल, अशी माहिती समोर आली आहे. मागली वर्षी एप्रिल ते डिसेंबर या फक्त नऊ महिन्यांच्या काळात अॅपल कंपनीने भारतामध्ये सुमारे अडीच बिलियन डॉलर किंमतीचे आयफोन निर्यात केले होते. 

मेक इन इंडिया योजनेचे यश( Success of Make in India)

साऊथ चायना मॉर्निग पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे. 2025 पर्यंत जगभरातील 25% आयफोन भारतामध्ये असेंबल होतील, असे नुकतेच जे. पी मॉर्गन या अमेरिकन कंपनीनेही म्हटले आहे. मोबाइल निर्मितीसाठी अॅपल कंपनीकडून गुंतवणूक मिळण्यात केंद्र सरकारला यश आल्याने ‘मेक इन इंडिया’ मोहिमेलाही चालना मिळाली आहे. भारतामध्ये मोबाइल निर्मितीसाठी अॅपलने मागील वर्षी सुरुवात केली होती. अगदी अल्प कालावधीमध्ये भारतामधील आयफोनचे उत्पादन वाढले आहे. अॅपल फोनच्या निर्मितीसाठी कंपनीकडून सुरुवातीपासून चीन आणि तैवानला पसंती दिली जात होती. मात्र, अमेरिका आणि चीनमधील राजकीय तणाव वाढत असल्याने चीनमधून अनेक अमेरिकी कंपन्यांनी गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. 

कोरोनाचा उद्रेक हे सुद्धा यासाठी तत्कालीन कारण ठरले. भारतामध्ये फॉक्सकॉन या कंपनीचा बंगळुरू शहराजवळ मोठा निर्मिती प्रकल्प आहे. 
भारत ही जगातील मोठी बाजारपेठ आहे, तसेच केंद्र सरकारच्या योजनांद्वारेही निर्मिती प्रकल्पांना सहकार्य करण्यात येत आहे. भारतामध्ये मनुष्यबळही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने भारत चीननंतरचे मोठे मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे.   

PIL योजनेद्वारे निर्मिती कंपन्यांना मदत (PIL Scheme to Manufacturing Companies)

केंद्र सरकारने निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह (PIL) ही योजना सुरू केली आहे. याअंतर्गत फॉक्सकॉन कंपनीला केंद्र सरकारची 3.6 बिलियन इतकी मदत मिळाली आहे. केंद्र फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि विस्ट्रॉन या तिन्ही कंपन्यांना अॅपल कंपनीच्या मोबाइलची निर्मिती करतात. या तिन्ही कंपन्यांना केंद्र सरकारने नुकतेच 41 हजार कोटींचे PIL योजनेअतंर्गत अनुदान दिले आहे. अॅपल कंपनी सध्या भारतामध्ये iPhone SE, iPhone 12, iPhone 13 and iPhone 14 या मॉडेल्सची निर्मिती करते. अॅपल प्रो सिरिजच्या मोबाइलची भारतामध्ये निर्मिती केली जात नाही. हे फोन्स भारतामध्ये आयात करण्यात येतात.