Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NCD Issue 2023: या कंपनीने केली, 350 कोटींचे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स बाजारात आणण्याची घोषणा

InCred Financial Services NCD

Image Source : www.hrkatha.com

Raise up to Rs 350 crore via NCDs: बिगर बँकिंग वित्तिय कंपनी बाजारात एनएसडी इश्यू करत आहे. किती तारखेला एनएसडी इश्यू होणार आहे, त्याची अंतिम तारीख काय, यातून काय फायदा होईल ही सर्व माहिती पुढे वाचा.

InCred Financial announces public issue of up to ₹350 crore of NCDs: बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC: non-banking financial company) इनक्रेड फायनॅन्शिअल सर्व्हिसेसने (InCred Financial Services Limited) प्रत्येकी 1 हजार रुपयांचे दर्शनी मूल्य हे 175 कोटींच्या इश्यूवर आधरीत आहे. एकूण 175 कोटींपर्यंतच्या ओव्हरसबस्क्रिप्शनसहीत 350 कोटी मुल्यांचे सिक्युअर्ड, रिडिमेबल नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरचे सार्वजनिक इश्यू जाहीर केले आहेत.

नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर म्हणजे काय? (What is Non-Convertible Debenture?)-

नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर म्हणजेच एनसीडी ही एकप्रकारची आर्थिक साधने आहेत. कंपनी ही साधने  जारी करते. हे प्रकारचे शेअर्सच असतात, मात्र फिक्स्ड डिपॉझिट किंवा बाँडसारखे असतात. कंपनी डिबेंचर्स पब्लिक इश्यू करून, या माध्यमातून कंपनी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते.  यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ठराविक दराने व्याज मिळते. एनएसडीचा कार्यकाळ निश्चित केलेला असतो, ते परिपक्व झाले की, गुंतवणूकदारांना त्यांच्या मूळ रक्कमे ठरवलेले व्याजाही मिळते. ठराविक कालावधीनंतर काही डिबेंचर शेअर्समध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात, त्याला कन्व्हर्टेबल डिबेंचर्स म्हणतात. एनसीडीच्या बाबतीत मात्र असे होत नाही. म्हणूनच त्यांना नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर म्हणतात.

एनएसडी कधी इश्यू करणार? (When will NSD issue?)-

इनक्रेड कंपनी आपले डिबेंचर्स 9 जानेवारी 2023, म्हणजे सोमवारी पब्लिक इश्यू करणार आहे. तर, 27 जानेवारी 2023, म्हणजे शुक्रवार ही शेवटची तारीख आहे.या एमसीडीला क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेडने (Credit Rating Information Services of India Limited) ए प्लस (A+) रेटिंग दिले आहे

या एनसीडीच्या पब्लिक इश्यूद्वारे उभारलेल्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम कर्ज देणे, वित्तपुरवठा आणि कंपनीच्या विद्यमान कर्जावरील मुद्दल आणि व्याज परतफेड करण्यासाठी वापरली जाईल. त्याच वेळी, उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट गरजांसाठी जाणार आहे.

एनसीडी अंतर्गत 9.45 टक्के ते 10 टक्के कूपन दर उपलब्ध आहेत आणि यामध्ये तुम्हाला तिमाही आणि वार्षिक आधारावर व्याजाचा पर्याय मिळतो. या एनसीडीमध्ये 27 महिने आणि 39 महिने दोन कालावधी आहेत. एनसीडीच्या प्रत्येक मालिकेतील कूपन दर आणि कालावधीसाठी खालील इश्यू स्ट्रक्चर टेबल पहा. या एनसीडीची सूची बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर केली जाणार आहे जेथे बीएसई नियुक्त स्टॉक एक्सचेंज असेल.

इन्क्रेडची ही एनसीडी अशा वेळी उघडली आहे जेव्हा इतर अनेक कंपन्या नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरद्वारे पैसे उभारण्याचा विचार करत आहेत.