Cumin price increase: प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग असलेले आणि जेवणाची चव वाढवणारे मसाले आता खूप महाग होतांना दिसून येत आहेत. मसाल्यांचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. कालचं माझी आई किराणा घेऊन आल्यानंतर मला म्हणाली….. बाई भाजी करतांना जिरे थोडे कमी वापर खूप महाग झाले. म्हणजे यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की मसाल्यांच्या किमती वाढल्या की गृहीणींना किती विचारपूर्वक सर्व मॅनेजमेंट करावं लागत.
मसाल्यांच्या भावात किती टक्के वाढ? (How much percentage increase in the price of spices?)
हळद, धणे, शहाजीरा, खरखर, तेजपान, दालचिनी, काळी मिरी या सर्व मसाल्यांच्या भावात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मसाल्यांशिवाय भारतीय जेवणाची कल्पनाच करता येत नाही. स्वादिष्ट आणि रुचकर भाज्यांसाठी मसाले आवश्यक असतात. अनेक गृहिणी वर्षभरासाठी स्वादिष्ट मसाला घरीच तयार करतात. यासाठी ती आवश्यक मसाले खरेदी करते. मात्र या मसाल्यांच्या किमती वाढल्याने ते जपून वापरावे लागत आहेत.
बाहेरील देशांतून होणारी आयातही कमी झाली आहे. हॉटेल्स, ढाब्यांवर मागणी वाढली आहे. विविध मसाल्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींची चिंता वाढली आहे.
मसाल्यांच्या किंमती पुढीलप्रमाणे.. (Prices of spices are as follows..)
मसाले | 2021-22 | 2022-23 |
हळद | 120 | 160 |
जिरा | 180 | 225 |
धणे | 120 | 140 |
दालचिनी | 280 | 320 |
काळी मिरी | 730 | 760 |
शाहजीरा | 650 | 700 |
जिऱ्याचे उत्पादन घटण्याची शक्यता.. (Cumin production is likely to decrease)
या वर्षी जिरा पिकाला थंडीचा फटका बसत आहे त्यामुळे देशातील जिरा उत्पादन (Cumin Production) घटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. लग्नसराई सुरू झाल्याने जिरे मागणी वाढणार त्यासोबतच निर्यातीसाठी सुद्धा जिरे कमी पडणार असल्याची शक्यता आहे. मागील हंगामातील जिरे साठा सुद्धा कमी आहे. भारतात 70 टक्के जिरा उत्पादन घेतले जाते. गुजरात आणि राजस्थानमध्ये सुद्धा उत्पादनात 10 टक्के घट झाली आहे.देशातील जिरा उत्पादन घट ही 33 टक्के असणार असल्याची शक्यता आहे. मागणी वाढणार आणि उत्पादन कमी असल्याने जिरा दर टिकून राहतील असा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे.