Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FASTag Collection Grow: फास्टटॅगमुळे सरकारच्या तिजोरीत वाढ; मागील 5 वर्षात महसुलात दुपटीने वाढ

FASTag Collection Grow

Image Source : www.swarajyamag.com

FASTag Collection Grow: संपूर्ण देशभरात 964 पेक्षा अधिक टोल नाके आहेत; जिथे फास्टटॅग प्रणाली लावण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे 143 तर महाराष्ट्रात 84 फास्टटॅग प्रणाली असलेले टोलनाके आहेत.

FASTag Collection Grow: नवीन वर्ष सुरू झाल्यापासून मागील 6 महिन्यात सरकारने फास्टटॅगच्या माध्यमातून 28,180 कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंतची ही सर्वाधिक कमाई असल्याचे बोलले जाते.

2021 ते 2022 या कालावधीत फास्टटॅगच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलात 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मागील 5 वर्षात म्हणजे 2017 ते 2022 या काळातील सरकारला फास्टटॅगमधून मिळालेल्या महसुला 34,778 कोटी रुपयाहून 50,855 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. जवळपास हा महसूल या वर्षात दुप्पट झाला आहे.

2021 पासून सरकारने सर्व गाड्यांसाठी फास्टटॅग बंधनकारक केला होता. तेव्हापासून टोलनाक्यामधून मिळणाऱ्या महसुलात वाढ झाल्याचे दिसून येते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)कडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मे 2023 पर्यंत देशातील 7.03 कोटी वाहनांना FASTag बसवण्यात आले आहे. 2019 मध्ये फक्त 1.70 कोटी वाहनांनी फास्टटॅग कोड लावला होता. त्यामध्ये 2019 नंतर झपाट्याने वाढ झाली.

कोणत्या राज्यात सर्वाधिक FASTag Toll नाके आहेत?

संपूर्ण देशभरात 964 पेक्षा अधिक टोल नाके आहेत; जिथे फास्टटॅग प्रणाली लावण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे 143 टोलनाके आहेत, जिथून फास्टटॅग प्रणालीच्या माध्यमातून टोल वसूल केला जातो. त्यानंतर उत्तर प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशमध्ये फास्टटॅग यंत्रणा लावलेले 114 टोलनाके आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान असून तिथे 104 FASTag Toll Plaza आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात 84, कर्नाटकात 77, तामिळनाडूत 69, आंध्रप्रदेशमध्ये 60 आणि तेलंगणात 51 आहेत.

FASTag Toll Plaza काय आहे?

फास्टटॅग ही टोल आकारणारी इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे. ही प्रणाली रेडिओ फ्रिक्वेन्सीवर आधारित काम करते. प्रत्येक फास्टटॅग टोलनाक्यावरील प्रणातील गाडीशी संबंधित माहिती जतन केलेली आहे. फास्टटॅगचा वापर होण्यापूर्वी गाडी थांबवून रोख पैसे किंवा कार्डच्या माध्यमातून टोल वसूल केला जातो होता. पण आता फास्टटॅगचा वापर होऊ लागल्यापासून गाडी थांबवण्याची गरज भासत नाही. रोख पैसे देणे किंवा कार्ड स्वॅप करणे अशा सर्व प्रक्रिया मागे पडल्या आहेत. फास्टटॅगमुळे टोलनाक्यावर पूर्वीसारखी गर्दीदेखील होत नाही. परिणामी वाहनचालकांचा बराचसा वेळ वाचू लागला आहे.

फास्टटॅग कार्ड कुठे विकत मिळते?

भारतातील कोणत्याही टोल नाक्यावर फास्टटॅग कार्ड विकत मिळते. याशिवाय हे फास्टटॅग अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय बँक आणि कोटक बँकेच्या ब्रान्चमधून मिळू शकेल. तसेच PayTM, Amazon Pay, Google Pay, PhonePe या डिजिटल प्लॅटफॉर्मवरूनही फास्टटॅग मिळवता येते.

फास्टटॅग हे तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक केलेले असते. गाडीवरील टॅग स्कॅन झाला की, पैसे कट करण्याच्या सूचना अगोदरचा बँकेला दिलेल्या असतात.  त्यामुळे जेव्हा तुम्ही टोलनाक्यावरून जाता. तेव्हा टोलनाक्यावरील मशीन तुमच्या गाडीवर लावलेला FASTag चा कोड स्कॅन करते आणि तुमच्या बँकेतून पैसे कट होतात. त्याचा मॅसेज तुमच्या मोबाईलवर देखील येतो. फास्टटॅगचे ही स्टीकर विकत घेतल्यानंतर त्याची मुदत 5 वर्षापर्यंतच असते. त्यानंतर मात्र तुम्हाला नवीन स्टीकर घ्यावे लागते.  

Source: www.pipanews.com/