Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Online Payment: इन्कम टॅक्स ऑनलाईन भरायचा आहे, जाणून घ्या कोणत्या बँका देतात ही सेवा

Income Tax

Income Tax Online Payment: आर्थिक वर्ष संपले की नोकरदार आणि करदात्यांची आयकर रिटर्न फायलिंगसाठी धावपळ सुरु होते.नोकरदारांचे डोळे कंपनीच्या अकाउंट विभागाकडे लागलेले असतात.'फॉर्म-16' आणि इतर महत्वाचे दस्त मिळाले की वैयक्तिक करदात्याला थेट ITR फायलिंग करण्याची सुविधा आयकर विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

आर्थिक वर्ष संपले की नोकरदार आणि करदात्यांची आयकर रिटर्न फायलिंगसाठी धावपळ सुरु होते. नोकरदारांचे डोळे कंपनीच्या अकाउंट विभागाकडे लागलेले असतात. 'फॉर्म-16' आणि इतर महत्वाची सर्टिफिकेट्स मिळाली की इन्कम टॅक्स फायलिंगचा मार्ग मोकळा होतो. वैयक्तिक करदात्याला थेट ITR फायलिंग करण्याची सुविधा आयकर विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ऑनलाईन कर भरणा (e-Pay Tax) करण्यासाठी आयकर विभागाने 24 बँकांना परवानगी दिली आहे. या 24 बँकांकडून टॅक्सपेअरला ऑनलाईन आयकर पेमेंट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. 

करदात्यांना नेट बँकिंग, डेबिट कार्ड, एनईएफटी, आरटीजीएस आणि अधिकृत बँकांच्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून ई-पे टॅक्स सुविधेचा वापर करता येणार आहे. नुकताच आयकर विभागेन RBL बँकेला ई-पे टॅक्स सुविधा सुरु करण्यास आयकर विभागाने परवानगी दिली. करदात्याला पॅन आणि टॅन नंबर तसेच मोबाईल नंबर सादर करुन ई-पे टॅक्स सेवा वापरता येणार आहे.

ई-पे टॅक्स सेवा कशी वापराल (How to use e-Pay tax service)

ई-पे टॅक्सची सुविधा वापरण्यापूर्वी ‘या’ स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्हाला आयकर भरणा करणे सोपे जाईल.

  • आयकर विभागाच्या वेब पोर्टलवर जा.
  •  ई-पे टॅक्स या सेक्शनवर क्लिक करा. 
  • यात पॅनकार्डची माहिती आणि मोबाईल क्रमांक सादर करा.
  • OTP छाननी केल्यानंतर पुढे तीन टप्पे पूर्ण करा.
  • टॅक्स पेमेंट कॅटेगरीमध्ये तुम्ही क्लिक केले की ई-टॅक्स पेज ओपन होईल.
  • यानंतर तुम्हाला असेसमेंट ईअर, मायनर हेड आणि इतर माहिती सादर केल्यानंतर पुढे प्रोसेस करा.
  • 'अ‍ॅड टॅक्स ब्रेकअप डिटेल्स' यावर क्लिक केल्यावर तुम्हाला किती कर भरायचा आहे याचा तपशील समोर येईल.
  • यानंतर तुम्ही पेमेंट कसे करणार याची निवड करुन पैसे अदा करु शकता. 
  • ई पे टॅक्सने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ई-मेल आणि एसएमएस प्राप्त होईल. तसेच तुम्ही टॅक्स पेमेंट केल्याचे चलान डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढू शकता. 

बँकांचे नाव

बँकांचेनाव

बँकांचे नाव

अ‍ॅक्सिस बँक

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ महाराष्ट्र

कॅनरा बँक

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

सिटी युनियन बँक

फेडरल बँक

एचडीएफसी बँक

आयसीआयसीआय बँक

आयडीबीआय बँक

इंडियन बँक

इंडियन ओव्हरसीज बँक

इंड्सइंड बँक

जम्मू  अ‍ॅंड कश्मिर बँक

करुर वैश्य बँक

कोटक महिंद्रा बँक

पंजाब नॅशनल बँक 

आरबीएल बँक

स्टेट बँक ऑफ इंडिया

साऊथ इंडियन बँक

पंजाब अँड सिंध बँक

युको बँक

युनियन बँक