Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FPI Investment: जुलै महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केले 'इतक्या' कोटींचे शेअर्स, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

FPI Investment in July

FPI Investment in July: जुलै महिना संपायला काहीच दिवस बाकी आहेत. असे असताना देखील भारतीय बाजारपेठेत 21 जुलै 2023 पर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आत्तापर्यंत भारतीय बाजारपेठेत किती विदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे आणि त्यावर तज्ज्ञांचे मत काय? जाणून घेऊयात.

भारतीय बाजारपेठ ही जगासाठी विकसित बाजारपेठ म्हणून उदयाला आली आहे. त्यामुळेच अनेक विदेशी गुंतवणूकदारांनी (FPI ) भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. मार्च 2023 पासून विदेशी गुंतवणूकदारांचे भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सातत्य राखत 21 जुलै 2023 पर्यंत भारतीय बाजारपेठेत 43,800 कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. जून 2023 मध्ये ही गुंतवणूक 47,148 कोटी पर्यंत पोहचली होती.

जुलै महिना संपायला काही दिवस बाकी आहेत, त्यामुळे मागील महिन्याच्या गुंतवणुकीपेक्षा या महिन्यात गुंतवणूक वाढेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर तज्ज्ञांचे मत काय, जाणून घेणार आहोत. तसेच डेट मार्केटमध्ये किती गुंतवणूक करण्यात आली आहे, हे देखील जाणून घेऊयात.

डेट मार्केटमधील गुंतवणूक जाणून घ्या

उपलब्ध आकडेवारीनुसार मार्च 2023 पासून भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदारांचे गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. जुलै महिन्याच्या 21 तारखेपर्यंत भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदारांनी 43,804 कोटी रुपये गुंतवले आहेत. मागील महिन्यात हीच गुंतवणूक 47,148 कोटी पर्यंत पोहोचली होती. विदेशी गुंतवणूकदारांनी डेट मार्केटमध्ये 2623 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

डिपॉझिटरी डेटानुसार शेअर मार्केटमधील विदेशी गुंतवणूक या वर्षात आत्तापर्यंत 1.2 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भारतीय बाजारपेठेतील विदेशी गुंतवणूक अधिक मजबूत आणि व्यापक होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जिओजित फायनान्शिअल सर्विसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले (V. K. Vijayakumar) की, भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे बाजारपेठेत मोठे करेक्शन येऊ शकते.

तर मॉर्निंग स्टार इंडियाचे असोसिएट डिरेक्टर- मॅनेजर हिमांशु श्रीवास्तव (Himanshu Srivastava, Associate Director-Manager of Morning Star India) यांनी याबाबत मत मांडताना सांगितले की, विदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या गुंतवणुकीमुळे भारतीय शेअर बाजार उच्चांकावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Source: hindi.financialexpress.com