भारतात क्लीन अँड ग्रीन वाहन म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा(EV) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढत असल्याने वाहन निर्मात्या कंपन्यांहीआता इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्राकडे संधी म्हणून पाहात आहेत. दरम्यान 2023 मध्ये भारतात 19 सप्टेंबर इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीच्या आकड्याने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे.
9 महिन्यात 10 लाख ईव्हीची विक्री
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये केवळ 9 महिन्यामध्ये 1,037,011 इलेक्ट्रिक वाहनांची (EV) विक्री झाली आहे. या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नोंदणीनुसार देशातील एकूण वाहन विक्रीध्ये इलेक्टिक वाहन विक्रीचा वाटा या वर्षामध्ये 6.4 % इतका आहे. दरम्यान 2022 मध्ये 1 मिलियन इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा टप्पा गाठण्यासाठी संपूर्ण वर्षाचा कालावधी ओलांडला होता.
इलेक्ट्रिक दुचाकीचा खप जास्त-
2023 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये सर्वाधिक वाटा हा दुचाकीचा आहे. भारतात इलेक्ट्रिक दुचाकीचा वापर आणि मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान एकूण इलेक्ट्रिक वाहनांपैकी 56 टक्के वाटा हा दुचाकीचा आहे. त्या खालोखाल तीनचाकी प्रवासी वाहनांचा खप जास्त आहे. दरम्यान मे महिन्यात सर्वाधिक 158,374 इलेक्ट्रिक वाहने विक्री झाली आहेत.
विविध सुविधांचा विक्रीसाठी फायदा-
ही विक्री वाढण्यामागे इलेक्ट्रिक व्हेईकल्ससाठी देण्यात आलेली FAME-II च्या सवलतीचा फायदा या विक्रीसाठी झालेला दिसून येतो. तसेच देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्यासाठी सरकारकडून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये वाहनधारकांना सार्वजनिक ठिकाणी चार्जिग स्टेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच वाहन कर्जाची उपलब्धता, EV खरेदीसाठी सरकारकडून मिळणाऱ्या सवलती, त्यामुळे वाहन खरेदीला चालना मिळाली असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.