Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSEDCL: इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढतेय, 10 महिन्यांत विजेचा खप विक्रमी पातळीवर पोहोचला

MSEDCL: इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढतेय, 10 महिन्यांत विजेचा खप विक्रमी पातळीवर पोहोचला

Image Source : www.mid-day.com

EV (Electric Vehicle) ची वाढती क्रेझ सर्वांनाच आकर्षित करत आहे. कारण, सर्वच बाबतीत ती सरस आहे. सोमवारी म्हणजेच 21 ऑगस्टला महावितरणने इलेक्ट्रिक वाहनांच्या वीज मागणीच्या वाढीत 10 महिन्यात तीनपट वाढ झाली असल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर, सरकारने देखील पर्यावरणाच्या रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना केल्या आहेत.

MSEDCL: दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे वाढते दर सामान्यांची चिंता वाढवत आहेत. पण, इलेक्ट्रिक वाहनांची वाढत्या संख्येची वाटचाल पर्यावरणाच्या आणि पैसे बचतीच्या दृष्टीने सामान्यांना परवडणारी आहे. कारण, राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मागील वर्षी म्हणजेच सप्टेंंबर 2022 मध्ये विजेची मागणी 4.56 दशलक्ष युनिट होती ती आता वाढून जुलै 2023 मध्ये 14.44 दशलक्ष झाली आहे. 

ही फक्त दहा महिन्यांची विज मागणीची आकडेवारी असून यात दहा महिन्यात तीनपट वाढ झाली असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पर्यावरणाच्या रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना केल्या आहेत.

सध्याच्या घडीला राज्यात सार्वजनिक आणि खासगी 3,214 चार्जिंग स्टेशन आहेत. तसेच, याच चार्जिंग स्टेशनमधून सर्वाधिक विज मागणी झाली असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत देखील झपाट्याने वाढ झाली आहे. कारण, 2018 मध्ये राज्यात 4,643 वाहनांची विक्री झाली होती. आता मार्च 2023 मध्ये हीच संख्या वाढून  2,98,838 वर गेली आहे. यामध्ये जवळपास 2.5 लाख दुचाकी असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तसेच,  सार्वजनिक वाहतुकीसाठी देखील इलेक्ट्रिक बसला मागणी वाढली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. कारण, 2018 ला फक्त 4 इलेक्ट्रिक बसेसची नोंदणी झाली होती. मात्र, आता तिच्या संख्येत वाढ झाली असून मार्च 2023 पर्यंत राज्यात 1399 बसेस बनवण्यात आल्या आहेत. बेस्टच्या ताफ्यातही सध्याच्या घडीला 400 हून अधिक इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध आहेत.

MSEDCL ला महावितरण म्हणून ही ओळखल्या जाते. महावितरण राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग सेवा पुरवणारी नोडल एजन्सी आहे. महावितरण इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन स्थापन करणे, खासगी स्टेशन उभारायला मदत करणे, मोबाईल अ‍ॅप बनवणे आणि सरकारला इलेक्ट्रिक वाहनांचे धोरणात्मक निर्णय घेण्यात मदत करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात प्रत्येक महामार्गावर चार्जिंग स्टेशन दिसण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक वाहन आहे सरस

इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यावरणाच्या रक्षणाला मदतच होणार आहे. तसेच, ग्राहकांना पेट्रोल-डिझेलसाठी पैसे देण्याची गरजही पडणार नाही. कारण, इलेक्ट्रिक वाहन वापरण्याला जास्त खर्च येत नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीला प्रति  किलोमिटर 2.12 रुपये खर्च येतो. तेच इलेक्ट्रिक दुचाकीला फक्त 54 पैसे खर्च येतो. तसेच, पेट्रोलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनाला प्रति किलोमिटर 7.57 रुपये खर्च येतो तर इलेक्ट्रिक चारचाकीला फक्त 1.51 रुपये खर्च येतो. यात ऑटोरिक्षाचा ही समावेश असून पेट्रोलवर प्रति किलोमिटर 3.20 रुपये खर्च येतो आणि इलेक्ट्रिकसाठी फक्त 59 पैसे खर्च आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला इलेक्ट्रिक वाहन वापरल्यास झळ बसणार नाही.