Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Important Tips to Avoid Blast Smartphones: जाणून घ्या, मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी महत्वपूर्ण टीप्स

Important Tips to Avoid Blast Smartphones

How to Prevent Phones from Exploding: सध्या मोबाईलमध्ये स्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. देशात विविध ठिकाणी मोबाईलमध्ये स्फोट झाल्याच्या घटनादेखील घडत आहेत. या अशा घटना टाळण्यासाठी आपणच आपली काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी आम्ही काही महत्वाच्या टीप्स सांगणार आहोत.

Useful Tips to Prevent Smartphone Explosion: आजकाल मुलांना रात्री-अपरात्रीपर्यंत मोबाईल पाहण्याची भयानक सवय लागली आहे. त्यांना मोबाईलचे एक प्रकारे व्यसन लागलेले आहे. किती का तास ते सोशलमिडीया व गेम खेळण्यावर घालवितात. अशा वेळी मोबाईल गरम होऊन कित्येक ठिकाणी मोबाईलमध्ये म्हणजे स्मार्टफोनमध्ये स्फोट (Blast) झाल्याच्या घटनाघडल्या आहेत. याच घटना टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्वपूर्ण टीप्स सांगणार आहोत.

मोबाईलचा मुळ चार्जर वापरणे आवश्यक (Must Use Original Mobile Charger)

सर्वप्रथम तुम्ही स्वत:च्याच मोबाईलचे चार्जर वापरण्याची सवय लावून घ्या. एकमेकांच्या मोबाईलचे चार्जर वापरल्यास बॅटरी खराब होते आणि बॅटरीचा स्फोट होतो. लोकल चार्जरमध्ये पावरचा प्रवाह हा कमी-जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे स्मार्टफोनच्या बॅटरीवर दबाव येतो आणि बॅटरीचा स्फोट होतो. ही दोन मोबाईल बॅटरी ब्लास्ट होण्याची प्रमुख कारणे असू शकतात.  

100 टक्के चार्जिंग करणे टाळा(Avoid Charging to 100 Percent)

मोबाईल पूर्णपणे स्वीच ऑफ होण्याची वाट पाहू नका, तत्पूर्वीच आपला मोबाईल चार्जिंगला लावा. त्यात ही मोबाईल पूर्णत: 100 टक्के चार्जिंग करणे टाळा. शक्यतो, मोबाईलची बॅटरी 30 टक्के होण्यापूर्वीच तो चार्जिंग करा. कारण ज्यावेळी चार्जिंग कमी असते, त्यावेळी फोन अधिक गरम होतो. त्यामुळे स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. त्याचबरोबर फोन जास्त चार्ज केल्यावरदेखील बॅटरीच्या क्षमतेवर अधिक परिणाम होतो व त्यावर दबाव येतो. त्यामुळे मोबाईलची चार्जिंग 98 टक्के झाली की, तो लगेच काढून घ्या.

फोन गरम झाल्यास, बंद करा (If the Phone Heats up, Turn it Off)

सोशलमिडीयावर जास्त वेळ घालविल्यास किंवा तासन् तास गेमिंग मोबाईलवर खेळत असल्यास फोन लगेच गरम होतो. तो अधिक गरम झाल्याने, त्याचा परिणाम बॅटरीवर होतो. कारण गेम खेळताना फोनचा प्रोसेसर अधिक वेगवानपणे काम करतो, त्यामुळे तो लवकर गरम होतो. मोबाईल गरम झाल्याने त्याचा बॅटरीवर परिणाम होऊन स्फोट होण्याची भिती असते. म्हणून मोबाईल अधूनमधून बंद करा व तो लगेच चार्जिंगला लावणे टाळा.