वेळ कोणावरही सांगून येत नाही. अचानक उद्दभवलेला एखादा आजार किंवा गंभीर अपघातानंतर करावी लागलेली तातडीची शस्त्रक्रिया (operation) संपूर्ण कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य ढवळून तर काढतेच, सोबत आर्थिक गणित देखील दीर्घ काळासाठी बिघडवून टाकते. हॉस्पटिलायझेशन, उपचारांवरचा होणार खर्च, व्यक्ती “source of income” असेल, तर होणारे अर्थार्जनाचे नुकसान संपूर्ण कुटुंबाला बॅक-फूटवर नेते. परंतु वेळीच घेतली गेलेली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी “in force” म्हणजे चालू अवस्थेमध्ये असेल तर उपरोक्त सर्व परिस्थितीपासून व्यक्ती आणि कुटुंबाचे संरक्षण करते.
मात्र हे हेल्थ कव्हर अत्यंत गरजेच्या वेळी उपयुक्त ठरण्यासाठी आवश्यक आहे, ते म्हणजे त्या पॉलिसीसाठीचे प्रिमिअमचे नियमितपणे वेळेत भरले जाणे. आणि कामाच्या व्यापामध्ये बुडाल्याने एखादा प्रिमिअमचा हप्ता चुकला तर? किंवा अगदी हवी तेव्हा हातामध्ये रक्कम नसेल तर? प्रीमियम वेळेमध्ये न भरल्यामुळे हेल्थ कव्हर “lapsed” म्हणजे अवैध तर नाही होणार ना! काळजी करू नका. सुदैवाने, हेल्थ इन्शुरन्स कंपनीज् आपल्याला विशिष्ट कालावधीत प्रीमियम भरण्याची वाजवी संधी देतात. आणि हा कालावधी आरोग्य विमा योजनांमध्ये “वाढीव कालावधी” म्हणजे “ग्रेस पिरियड (Grace Period)”म्हणून ओळखला जातो. या ग्रेस कालावधीमध्ये आपले हेल्थ-कव्हर सक्रिय राहत असते.
हेल्थ इन्शुरन्स कंपनी पॉलिसीधारकाला प्रीमियमची देय तारीख (Premium Due Date) उलटून गेल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये प्रीमियमचा भरणा करण्याची परवानगी देते. हा कालावधी 24 तासांपासून ते 30 दिवसांपर्यंत कितीही असू शकतो. म्हणून हेल्थ-कव्हर घेतल्यानंतर आणि त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी त्या पॉलिसीचे रिन्यूअल (renewal) करीत असताना पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये नमूद केलेल्या ग्रेस पिरियडच्या कालावधीचा उल्लेख तपासून घेणे गरजेचे आहे. कारण रेग्युलर प्रीमियमचा भरणा करता आला नाही आणि ग्रेस पिरियडचा कालावधी अनावधानाने लक्षात न राहिल्यास हेल्थ-कव्हर अवैध होऊन जाते. ग्रेस पिरियडमध्ये आलेले क्लेम्स इन्शुरर नाकारू शकतो.
बहुतेक हेल्थ इन्शुरन्स कंपन्या ग्रेस पिरियडमध्ये आलेल्या क्लेमची पुर्तता करत नाहीत, जोपर्यंत पॉलिसीधारक ग्रेस पिरियडनुसारच्या देय तारखेपर्यंत प्रीमियम भरत जात नाही. तेव्हा अनियोजित (unplanned) हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत अखंड प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी आपण आपला हेल्थ इन्शुरन्स “In force” स्थितीमध्ये ठेवणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून अनावश्यक त्रास टाळण्यासाठी ग्रेस पिरियडवर अवलंबून न राहता देय तारखेच्या आत प्रीमियम भरल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक वर्षी नूतनीकरण (Renewal) पेमेंट न केल्यास आतापर्यंत भरलेले सर्व प्रीमियम आणि एन्जॉय करत आलेले संपूर्ण कव्हरेज निरर्थक तर होतेच, पण “नो क्लेम बोनस (NCB)” म्हणजे यापूर्वी पॉलिसी-टर्मच्या दरम्यान कोणतेही क्लेम न केल्यामुळे मिळालेल्या “बोनससह सर्व ऑफर” देखील निरर्थक (lapsed) होतो. एवढेच नाही तर, कॅन्सर, हृदय-रोगासारखे काही गंभीर आजार, ज्यांना उपचार मिळण्यापूर्वी ठराविक प्रतीक्षा कालावधी (waiting period) असतो, तो देखील रद्द होऊ शकतो. म्हणजे पुन्हा त्या आजारांना पूर्वीसारखे हेल्थ-कव्हर मिळण्यासाठी आपल्याला पुनः एकदा मेडिकलला (वैद्यकीय तपासणी) आणि त्यांनंतरच्या प्रतीक्षा कालावधीला सामोरे जावे लागते. आणि त्याहीपेक्षा पॉलिसी लॅप्स झाल्याने नवीन हेल्थ-कव्हर घेताना जास्त प्रीमियम भरावा लागतो.
बहुतांश हेल्थ इन्शुरन्स कंपन्या पॉलिसीधारकाला नूतनीकरण प्रीमियम (Renewal Premium) भरण्यासाठी पुरेसा वेळ देतात. तथापि, पॉलिसीवर विमा कंपनीने ग्रेस पिरियड न दिल्यास, पॉलिसीधारकाने अंतिम मुदत किंवा देय तारीख चुकवल्यास हेल्थ कव्हर संपुष्टात येते. अपघातासारख्या अनपेक्षित हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत हे विशेषतः महत्त्वपूर्ण आहे.