सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन महागले असले, तरीही मुबलक इंटरनेट डेटा उपलब्ध झाला आहे. यासोबतच अनेक सोयीसुविधा मिळायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी परदेशात राहणाऱ्या कोणत्याही नातेवाईकाला कॉल, मेसेज किंवा एखादी फाईल पाठवायची असेल, तर त्यासाठी ठराविक शुल्क किंवा पैसे द्यावे लागत होते. मात्र आता मुबलक इंटरनेटमुळे ही सुविधा निशुल्क झाली आहे. आज आपण वायफाय कनेक्शन किंवा मोबाईल डेटा वापरून कोणत्या ॲपच्या मदतीने मोफत इंटरनॅशनल कॉल, मेसेज किंवा मीडिया शेअरिंग करू शकतो, त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. कोणते आहेत ते ॲप्स चला जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
व्हॉट्सॲप (WhatsApp)
तुम्हाला मेसेज, व्हॉईस कॉल किंवा व्हिडिओ कॉल करायचा असेल, तर सध्या जगभरात व्हॉट्सॲप अतिशय लोकप्रिय ॲप म्हणून चर्चेत आहे. यामध्ये एंड टू एंड एन्क्रीप्शनची सुविधा देण्यात आली आहे. ज्यामुळे तुमचे चॅट, व्हॉईस मेसेज, GIF आणि स्टिकर्स सुरक्षित राहतात. तुम्ही कोणत्याही लोकेशनवरून कोणालाही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. केवळ इंटरनेटच्या मदतीने तुम्ही या सेवेचा आनंद घेऊ शकता. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्ही इंटरनेट कॉलिंगचाही आनंद लुटू शकता.
मेसेंजर (Messenger)
मेटा प्लॅटफॉर्मचे मेसेंजर हे ॲप देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या ॲपच्या मदतीने तुम्ही जगभरातील कुठल्याही व्यक्तीशी टेक्स्ट मेसेज, मीडिया शेअरिंग, व्हॉईस कॉलिंग, व्हिडिओ कॉल यासारख्या अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता. हे ॲप मेटाच्या फेसबुक ॲपसोबत जोडले गेले आहे. या ठिकाणी तुम्हाला समोरच्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट टाकावी लागेल. त्या व्यक्तीने रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही विनामूल्य सेवांचा आनंद लुटू शकता.
स्काईप (Skype)
स्काईप हे इंटरनेटवरील कदाचित पहिले ॲप असेल, ज्याने VolP कॉलिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोल्युशनची सुविधा उपलब्ध करून दिली. अनेक व्यावसायिक कामाच्या ठिकाणी या ॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्हॉट्सॲप प्रमाणेच स्काईपवर देखील इन्स्टंट मेसेजची सुविधा आणि फाईल शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. हे ॲप देखील विनामूल्य असून ॲप टू ॲप कॉलिंगची अनुमती देते. हे ॲप Android, iOS आणि Windows सारख्या ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे ॲप चालू करण्यासाठी तुम्हाला केवळ तुमचा ई-मेल आयडी आणि इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.
Viber
Viber या ॲपवर तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबरच्या मदतीने अकाउंट क्रिएट करू शकता. यावर देखील कॉलिंग, टेक्स्ट मेसेजिंग, मीडिया शेअरिंग, व्हॉईस आणि व्हिडिओ चॅट यासारखे अनेक ऑप्शन्स विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये वापरकर्ते ॲप-टू-ॲप कॉलिंगचा आनंद लुटू शकतात.
Source: hindi.financialexpress.com