बाजार नियामक सेबीने (SEBI) IPO मध्ये बोली लावण्यासाठी नियमांमध्ये (IPO Rules Change) मोठे बदल केले आहेत. आता फक्त तेच गुंतवणूकदार पब्लिक इश्यूसाठी बोली लावू शकतील, ज्यांना कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे आहेत. हा नियम सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी लागू असेल. सेबीला माहिती मिळाली होती कि काही संस्थात्मक आणि श्रीमंत गुंतवणूकदार फक्त आयपीओ (IPO) चे सबस्क्रीप्शन वाढविण्यासाठी बोली लावत आहेत. शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. नवीन नियम सबस्क्रीप्शन वाढविण्यासाठी बोली लावण्यास प्रतिबंध करेल. नवीन नियम 1 सप्टेंबर 2022 पासून लागू होणार आहे.
नियमात झाला हा बदल
यासंदर्भात सेबीने एक परिपत्रक जरी केले आहे. गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात त्यासाठी लागणार निधी उपलब्ध झाल्यावरच आयपीओ (IPO) अर्जावर प्रक्रिया केली जाईल असे या परिपत्रकात म्हंटले आहे. बाजार नियामक परिपत्रकानुसार स्टॉक एक्सचेंजेस इलेक्ट्रॉनिक बुक प्लॅटफॉर्मवरअर्ज स्वीकारले जातील, जेव्हा याच्या सोबत मनी ब्लॉक झाल्याचे कन्फर्मेशन होईल.
सर्व गुंतवणूकदारांना लागू
नवीन नियम सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना लागू होणार आहेत. आयपीओमध्ये (IOP) बोली लावण्यासाठी किरकोळ, पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB), गैर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यासारख्या श्रेणी तयार केल्या आहेत. 1 सप्टेंबर 2022 पासून बाजारात आलेल्या सर्व पब्लिक इश्युना हा नियम पाळावे लागेल. सध्या सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांचे फंड एएसबीए आधारावर ब्लॉक केले जातात पण व्यावहारिक प्रकारे , क्यूआयबी (QIB) आणि एनआयआयमध्ये (NII) काही शिथिलता आहे. मार्केट रेग्युलेटरला माहिती मिळाली होती कि अलीकडील काही आयपीओमधील काही विशेष अर्ज यासाठी रद्द करावे लागले, कारण गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नव्हते. आता आइपीओमध्ये बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप झाल्यानंतरच एएसबीए फ्रेमवर्कद्वारे त्यांच्या बँक खात्यातून पैसे निघतात.