Debit Credit Card Alert: तुम्ही जर वाय-फाय डेबिट क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सावध राहा! आणि ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सध्या सर्वच बँका ग्राहकांना वायफाय सुविध असलेले कॉन्टॅक्टलेस कार्ड देत आहेत. या प्रकारचे कार्ड स्वाईप करण्याची किंवा पीओएस मशीनमध्ये टाकण्याची किंवा पेमेंट करताना पिन क्रमांक टाकण्याची गरज पडत नाही. पण सध्या याच सोयीचा काही जण गैरफायदा घेत लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत.
भारत आता कुठे 100 टक्के साक्षरतेच्या जवळ जात आहे. त्यात आर्थिक आणि डिजिटल साक्षरता ही अनेक जणांसाठी खूप दूरची गोष्ट आहे. यामुळे अनेकजणांची टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून फसवणूक होऊ शकते. आपल्याकडे बरीच अशी कॉफी हाऊस आहेत किंवा डी-मार्ट किंवा मोठमोठ्या शॉपिंगमॉलमध्ये अशाप्रकारच्या वायफाय डेबिट/क्रेडिट कार्डचा (Wi-Fi Debit/Credit Card) वापर केला जातो. इथे तुम्हाला कार्ड स्वाईप करावे लागत नाही किंवा पिन क्रमांकही टाकावा लागत नाही. बँकेतून पैसे कट झाले की, त्याचा मॅसेज मोबाईलवर येतो.
Wi Fi कार्डमध्ये धोका काय?
वायफाय कार्डमध्ये बसवण्यात ट्रान्समिटेड चीप ही कोणत्याही अधिकृत पीओएस (Point of Sale-POS) मशीनवर चालते. पण यामुळे कार्डधारकाची फसवणूदेखील होऊ शकते. कारण या कार्डचा वापर करताना कार्डधारकाला पिनक्रमांक न टाकता, स्वाईप न करता याचा वापर करता येतो.
Wi Fi कार्ड कसे ओळखायचे?
डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हातात घ्या. त्यावर Wi-Fi साठी वापरले जाणारे चिन्ह आहे का, चेक करा. जर तसे चिन्ह तुमच्या कार्डवर असेल तर तुमचे कार्ड वायफाय इनेबल्ड म्हणजेच कॉन्टॅक्टलेस कार्ड आहे. या कार्डमध्ये वायफाय प्रणाली वापरण्यासाठी निअर फील्ड कम्युनिकेशन आणि आरएफआयडी हे तंत्रज्ञान वापरले जाते. या कार्डने 5000 रुपयांपर्यंतचे व्यवहार बिना स्वाईप करता किंवा बिना पिनक्रमांक टाकता करता येतात.
Wi Fi कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी
- बँकेकडून कार्ड घेताना कोणते कार्ड दिले जात आहे, हे समजून घ्यावे.
- खरेदी केल्यानंतर आठवणीने बिल मागून घ्यावे.
- खर्चासाठी किंवा व्यवहारासाठी कोणते कार्ड वापराचे हे ठरवणे.
- शॉपिंग करताना वायफाय कार्ड दुकानदाराच्या हातात देऊ नका.
- वायफाय कार्डमधून व्यवहार केल्यावर लगेच मॅसेज चेक करा.