Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

OTT Subscriptions: तुम्हीही वेब सीरिज आणि सिनेमांचे चाहते असाल, तर 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मचा सबस्क्रीप्शन प्लॅन जाणून घ्या

OTT Subscription Plans

OTT Subscription Plans: कोविड महामारीनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर ओटीटी प्लॅटफॉर्म उदयाला आले. भारतात प्रामुख्याने नेटफ्लिक्स (Netflix), ॲमेझॉन प्राईम (Amazon Prime), डिज्नी हॉटस्टार (Disney Hotstar) आणि झी 5 (Zee 5) हे प्लॅटफॉर्म पाहिले जातात. त्यामुळे या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रीप्शन प्लॅन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतात गेल्या काही वर्षांमध्ये ओटीपी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. कोविड महामारीच्या दरम्यान भारतातील टेलिव्हिजन आणि सिनेमागृह बंद असल्याकारणाने लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे मोर्चा वळवला. या प्लॅटफॉर्मवर प्रादेशिक भाषेतील आशय आणि सर्वोत्तम कथानक लोकांना पाहायला मिळाले. बरेसेच ओटीटी प्लॅटफॉर्म हे मोफत एंटरटेनमेंटची सुविधा पुरवतात. मात्र देशातील प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये ॲमेझॉन प्राईम (Amazon Prime), डिज्नी हॉटस्टार (Disney Hotstar), नेटफ्लिक्स (Netflix), झी 5 (Zee 5) यांचा समावेश होतो.

तुम्हाला दर्जेदार आणि सर्वोत्तम कॉन्टेन्ट पाहायचा असेल, तर पेड सबस्क्रीप्शन घ्यावे लागणार आहे. हे सबस्क्रिप्शन प्लॅन मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर केले जातात. ज्यामध्ये मिळणारे बेनिफिट्स देखील वेगवेगळे असतात. तुम्हीही ओटीपी ॲप्स वापरत असाल, तर त्याच्या सबस्क्रिप्शन प्लॅनबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

नेटफ्लिक्सचा सबस्क्रीप्शन प्लॅन जाणून घ्या

प्रादेशिक भाषेतील दर्जेदार वेब सीरिज पाहायच्या असतील, तर भारतातील नंबर वन प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सचा सबस्क्रिप्शन प्लॅन तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. या प्लॅनमध्ये कंपनीने मोबाईल, बेसिक, स्टॅंडर्ड आणि प्रीमियम असे सेगमेंट केले आहेत.

मोबाईल सेगमेंटमध्ये 149 रुपयांचा मासिक रिचार्ज करून लोक अनलिमिटेड एंटरटेनमेंटचा आनंद लुटू शकतात. तर बेसिक सेगमेंटमध्ये 199 रुपयांचा रिचार्ज करून हा सबस्क्रिप्शन प्लॅन एक्सेस मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि टॅबवर पाहू शकतात.

स्टॅंडर्ड सेगमेंटमध्ये मासिक 499 रुपयांचा रिचार्ज करून हा प्लॅन मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि टॅबवर पाहता येणार आहेत. याशिवाय प्रीमियम सेगमेंटमध्ये मासिक 649 रुपयांचा रिचार्ज करून मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि टॅब यासारख्या चार प्लॅटफॉर्मवर अनलिमिटेड एंटरटेनमेंटचा आनंद घेता येणार आहे.

ॲमेझॉन प्राईमचा सबस्क्रीप्शन प्लॅन जाणून घ्या

तुम्हालाही ॲमेझॉन प्राईमवरील वेगवेगळ्या वेब सिरीज आणि सिनेमांचा आनंद घ्यायचा असेल, तर ॲमेझॉन प्राईमचा सबस्क्रीप्शन प्लॅन माहीत असणे गरजेचे आहे. ॲमेझॉन प्राईमचा मासिक रिचार्ज 299 रुपयांचा असून त्रैमासिक रिचार्ज 599 रुपयांचा आहे. तुम्हाला वार्षिक रिचार्ज करायचा असेल, तर 1499 रुपये भरून अनलिमिटेड एंटरटेनमेंटचा आनंद लुटू शकता. ॲमेझॉन प्राईम लाईटचा वार्षिक रिचार्ज 999 रुपयांचा आहे.

या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मराठी, हिंदी, गुजराती, तमिल, तेलुगु, मल्याळम यासारख्या अनेक भाषांमधील एंटरटेनमेंट कार्यक्रम पाहता येणार आहेत. हा सबस्क्रीप्शन प्लॅन तुम्ही मोबाईल आणि लॅपटॉपला ॲक्सेस करू शकणार आहात.

डिज्नी हॉटस्टारचा सबस्क्रिप्शन प्लॅन जाणून घ्या

भारतात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून डिज्नी हॉटस्टारला ओळखले जाते. या ओटीटी प्लॅटफॉर्मचा रिचार्ज मोबाईल, सुपर आणि प्रीमियम अशा तीन सेगमेंटमध्ये करता येतो.

मोबाईल सेगमेंटमध्ये त्रैमासिक आणि वार्षिक असे दोन प्लॅन उपलब्ध आहेत. केवळ 149 रुपयांमध्ये डिज्नी हॉटस्टारचे तीन महिन्यांचा सबस्क्रिप्शन आणि 499 रुपयांमध्ये वार्षिक रिचार्ज करता येणार आहेत. केवळ एकच व्यक्ती मोबाईलवर या सबस्क्रिप्शन प्लॅनला ऍक्सेस करू शकणार आहे.

सुपर प्लॅनमध्ये 2 लोक मोबाईल आणि लॅपटॉपसह एक्सेस करू शकणार आहेत. या सुपर सेगमेंटच्या वार्षिक प्लॅनची किंमत 899 रुपये असणार आहे. तर कंपनीच्या प्रीमियम सेगमेंटला तीन व्यक्ती एक्सेस करू शकणार आहेत. यासाठी वार्षिक 1499 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.

झी 5 च्या सबस्क्रीप्शन प्लॅनबद्दल जाणून घ्या

झी 5 वर युजरला अनलिमिटेड एंटरटेनमेंटचा खजाना पाहायला मिळणार आहे. यामध्ये कंपनीने मोबाईल, प्रीमियम एचडी आणि प्रीमियम 4K असे सेगमेंट केले आहेत. मोबाईल सेगमेंटमध्ये 499 रुपयांचा रिचार्ज करून वर्षभर अनलिमिटेड एंटरटेनमेंटचा आनंद लुटता येईल. या सेगमेंटमध्ये केवळ एकच व्यक्ती हा प्लॅन एक्सेस करू शकणार आहे.

तर प्रीमियम एचडी सेगमेंटमध्ये 699 रुपयांचा वार्षिक रिचार्ज करून कार्यक्रम पाहता येतील. या प्लॅनमध्ये 2 व्यक्ती एक्सेस करू शकणार आहेत. तर प्रीमियम 4K सेगमेंटमध्ये वार्षिक 1499 रुपयांचा रिचार्ज करून 4 लोक हा प्लॅन एक्सेस करू शकणार आहेत.