भारतातील टू व्हीलर सेगमेंटमध्ये आता बाईक सोबत स्कूटरची विक्री मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात झाली आहे. कॉलेजमधील बहुसंख्य मुलांकडे आता बाईक ऐवजी स्कूटर्स पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्कूटरचा लुक हा नवीन आणि आकर्षक आहे. या स्कूटर्समध्ये अनेक आधुनिक फीचर्स कंपनीने दिलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे बाईकसारखी यामध्ये गिअर सिस्टीम नाही, त्यामुळे मुलांप्रमाणे मुलीही अगदी सहज ही स्कूटर चालवू शकतात.
वाढते स्कूटरचे मार्केट लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी आता स्कूटर सेगमेंटमध्ये पॉवरफूल स्कूटर्स बनवायला सुरुवात केली आहे. या स्कूटर्स 125cc सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आल्या आहेत. भारतीय बाजारपेठेत सध्या टीव्हीएस (TVS),होंडा (Honda), सुझुकी (Suzuki),यामाहा (Yamaha) यासारख्या कंपन्यांनी सर्वोत्तम स्कूटर्स बनवायला आणि त्याची विक्री करायला सुरुवात केली आहे. जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, तर आज आम्ही तुम्हाला बेस्ट 125cc स्कूटर्सबद्दल माहिती देणार आहोत. सोबत त्याची किंमत देखील सांगणार आहोत.
Table of contents [Show]
Honda Dio 125
नामांकित होंडा कंपनीची डीओ 125 ही स्कूटर कॉलेज स्टुडंटसाठी उत्तम पर्याय आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 83,400 रुपयांपासून सुरु होते. 125cc चे इंजिन असलेली ही स्कूटर 55 किलोमीटरचे मायलेज देणार आहे. कंपनीकडून एकूण 7 रंगांचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या स्कूटरमध्ये कंपनीने अंडर सीट स्टोरेज, ऑटो स्टार्ट की बटन, एक्स्टर्नल फ्यूल लीड आणि स्पॉटी टेल लाईट यासारखे अनेक फीचर्स दिले आहेत.
Suzuki Access 125
सुझुकी कंपनीची Suzuki Access 125 ही स्कूटर देखील एक उत्तम पर्याय म्हणून उपलब्ध आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 79,400 रुपयांपासून सुरू होते. 125cc चे इंजिन असलेली ही स्कूटर 55 किलोमीटरचे मायलेज देणार आहे. कंपनीकडून एकूण 14 रंगांचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या स्कूटरमध्ये कंपनीने ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी एलईडी हेडलॅम्प आणि साईड पोझिशन लॅम्प तसेच ऑटो स्टार्ट इंजिन बटन आणि यूएसबी सॉकेट दिले आहे.
Yamaha RayZR 125
यामाहा कंपनीची 'Yamaha RayZR 125' ही स्कूटर अनेक आधुनिक फीचर्स आणि नवीन डिझाईनसह उपलब्ध आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 89,530 रुपयांपासून सुरू होते. 125cc चे इंजिन असलेली स्कूटर 60 किलोमीटरचे मायलेज देणार आहे. यामध्ये कंपनीने तीन मुख्य रंग उपलब्ध करून दिले आहेत. ज्यामध्ये डार्कमॅट ब्ल्यू (Dark Matte Blue), लाईट ग्रे वरमिलियन (Light Grey Vermillion), मॅट ब्लॅक (Matte Black) यांचा समावेश करण्यात आला आहे.
TVS Jupiter 125
टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर 125 ही स्कूटर देखील कॉलेज स्टुडंटसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 85,272 रुपयांपासून सुरू होते. 125cc चे इंजिन असलेली ही स्कूटर ग्राहकांना ऑन रोड 60 किलोमीटरचे मायलेज देणार आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने चार वेगवेगळे रंग उपलब्ध करून दिले आहेत.TVS Jupiter 125 आपल्या मोठ्या डायमेन्शन्स व कन्टेम्पररी डिझाईनसह मस्क्युलिन लुक देते. ज्यामुळे तुमची रोडवरील उपस्थिती अगदी उठून दिसते.