सध्या आर्थिक गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP), शेअर्स (Share Market), कंपन्यांचे बॉंड (Company Bonds), पोस्टातील वेगवेगळ्या गुंतवणूक योजना (Post Office Scheme) आणि बँकेतील मुदत ठेव (Bank FD) यासारखे पर्याय उपलब्ध आहे. मात्र यामधील सर्वात सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारी पद्धत म्हणून बँकेतील मुदत ठेवीकडे पाहिले जाते. प्रत्येक बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याजदर हे वेगवेगळे असते. जर तुम्हीही मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर खाजगी क्षेत्रातील कॅनरा बँकेच्या मुदत ठेवीत (Canara Bank FD) किती व्याजदर दिले जाते आणि या मुदत ठेवीत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यावर मॅच्युरिटीवेळी किती रुपयांचा परतावा मिळेल, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
कॅनरा बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याजदर जाणून घ्या
खाजगी क्षेत्रातील कॅनरा बँक (Canara Bank) आपल्या ग्राहकांना मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर ऑफर करत आहे. ही बँक 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 4 ते 7% पर्यंत व्याजदर ऑफर करत आहे. तर जेष्ठ नागरिकांना 4 ते 7.50% व्याजदर दिला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना कॅनरा बँकेतील प्रत्येक मुदत ठेवीवर 0.50% अतिरिक्त व्याजदर मिळणार आहे.
1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल?
जर तुम्ही कॅनरा बँकेच्या मुदत ठेवीमध्ये (Canara Bank FD) 1 लाख रुपयांची गुंतवणूक 1 वर्षासाठी केली, तर सर्वसामान्य नागरिकांना 7% व्याजदराच्या हिशोबाने मॅच्युरिटीवेळी, 1,07,186 रुपयांचा परतावा मिळेल. या गुंतवणुकीत 7,186 रुपये निव्वळ व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याजदरानुसार 1,07,714 रुपयांचा परतावा मिळेल. ज्यामध्ये त्यांना 7,714 रुपयांचे निव्वळ व्याज मिळेल.
हीच गुंतवणूक 2 वर्षांसाठी सर्वसामान्य नागरिकांनी केली, तर त्यांना 6.85% व्याजदरानुसार मॅच्युरिटीवेळी 1,14,550 रुपयांचा परतावा मिळेल. यामध्ये 14,550 रुपये निव्वळ व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.35% व्याजदरानुसार 1,15,681 रुपये परतावा मिळेल. ज्यात 15,681 रुपये निव्वळ व्याज मिळणार आहे.
ग्राहकांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक 3 वर्षांसाठी मुदत ठेवीमध्ये केली, तर सर्वसामान्य नागरिकांना 6.80% व्याजदरानुसार मॅच्युरिटीवेळी 1,22,420 रुपयांचा परतावा मिळेल. ज्यामध्ये 22,420 रुपये निव्वळ व्याज मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.30% व्याजदरानुसार मॅच्युरिटीवेळी 1,24,238 रुपयांचा परतावा मिळेल. ज्यातून 24,238 रुपयांचे व्याज मिळणार आहे.
जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने कॅनरा बँकेच्या मुदत ठेवीत 5 वर्षासाठी गुंतवणूक करत असाल, तर 1 लाख रुपये गुंतवल्यावर सर्वसामान्य नागरिकांना 6.70% व्याजदराच्या हिशोबाने 1,39,407 रुपयांचा परतावा मिळेल. यामध्ये 39,407 रुपये फक्त व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.20% व्याजदरानुसार मॅच्युरिटीवेळी 1,43,578 रुपयांचा परतावा मिळेल. तर यातून 43,578 व्याज मिळणार आहे.