सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केलेल्या अमृत महोत्सव विशेष मुदत ठेव योजनेला मुदतवाढ दिली आहे. अमृत महोत्सव एफडीवर ठेवीदारांना 7.15% व्याज मिळेल. याच योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 7.65% व्याज मिळणार आहे.
आयडीबीआय बँकेची अमृत महोत्सव मुदत ठेव ही 375 दिवस आणि 444 दिवस कालावधीसाठी आहे. नागरिकांना या विशेष मुदत ठेव योजनेत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल.
अमृत महोत्सव एफडी 444 दिवसांसाठी ठेवीदारांना 7.15% व्याज मिळेल. याच योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 7.65% व्याज मिळणार आहे.
अमृत महोत्सव एफडी 375 दिवस मुदतीच्या ठेवीवर 7.65% व्याज मिळणार आहे. याशिवाय एनआरई आणि एनआरओसाठी 7.10% व्याज मिळेल, असे बँकेने म्हटले आहे. या दोन्ही स्पेशल एफडीमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्यास परवानगी आहे, मात्र त्यावर 1% दंडात्मक व्याज भरावे लागेल.
आयडीबीआय बँकेकडून 7 दिवसांपासून 10 वर्ष मुदतीच्या ठेवी स्वीकारल्या जातात. विविध ठेवींवर सर्वसाधारण ठेवीदारांना 3% ते 6.80% व्याज दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.30% व्याज दिले जाते.
SBI अमृत कलश ठेव योजनेला मुदतवाढ
भारतीय स्टेट बँकेने अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. एसबीआयच्या वेबसाईटनुसार अमृत कलश या 400 दिवसांच्या ठेव योजनेत ठेवीदारांना 7.1% व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना 7.6% व्याज मिळेल. एसबीआय अमृत कलश ही विशेष ठेव योजना 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु होती. मात्र ठेवीदारांचा प्रतिसाद पाहता या योजनेत आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या ठेव योजनेत मुदतपूर्व पैसे काढले तर त्यावर 0.50% ते 1% या दरम्यान पेनल्टी भरावी लागेल.