Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HP Laptop Launch: HP कंपनीने लॉन्च केले 4 नवीन लॅपटॉप; किंमत 40 हजारांपासून सुरु

HP Laptop Launching

Image Source : www.indiapostasen.com

HP Laptop Launching: नामांकित टेक कंपनी HP ने मंगळवारी (18 एप्रिल) भारतातील तरुण ग्राहकांसाठी 4 नवीन लपटॉप लॉन्च केले आहेत. अपडेटेड प्रोसेसरसह या लॅपटॉपमध्ये टचस्क्रीन फीचर बघायला मिळेल. या लॅपटॉपची किंमत 40 हजारांपासून सुरू आहे.

HP ही कंपनी देशात उत्तम गुणवत्ता व आधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते. कंपनीने मंगळवारी (18 एप्रिल) भारतात एकाच दिवशी 4 लॅपटॉप लॉन्च केले आहेत. देशातील तरुण ग्राहकांवर लक्ष्य केंद्रित करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. HP कंपनीच्या बहुचर्चित पव्हेलियन मालिकेतील यात दोन लॅपटॉप आहेत. HP Pavilion Plus 14, Pavilion x360, HP 14 आणि HP 15 या मॉडेल्सचा यात समावेश असणार आहे. नवीन HP Pavilion Plus लॅपटॉप  Intel Core 13 जनरेशन प्रोसेसर उपलब्ध होणार आहे. तसेच हे लॅपटॉप टचस्क्रीन, कन्व्हर्टेबल क्रीन, स्लीक डिझाइन व काही  उत्कृष्ट  कॉन्फिगरेशनसह सुसज्ज असणार आहे.

नवीन लॅपटॉपमध्ये मिळेल मॅन्युअल कॅमेरा शटर

Pavillion Plus 14 आणि HP Pavilion x360 या दोन लॅपटॉपमध्ये मॅन्युअल कॅमेरा शटर प्रदान करण्यात आले आहे. तसेच, HP 14 आणि HP 15 लॅपटॉप लॉग-इनसाठी फिंगरप्रिंट हे फीचर असणार आहे. हे लॅपटॉप तयार करतांना कंपनीने निसर्गाचा विचार करून ओशन बाउंड प्लास्टिक आणि पोस्ट-कझ्युमर रिसायकल प्लास्टिकचा वापर केला आहे.

HP 14 आणि 15

HP हे दोन्ही लॅपटॉप आकारातील फरकाशिवाय दिसायला सारखेच दिसतात. HP 15 मध्ये 15.6-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.  तसेच, हे लॅपटॉप 13th Gen Intel Core i3 प्रोसेसर द्वारे समर्थित आहे. या लॅपटॉपचे वजन 1.6 किलो इतके आहे. त्याचप्रमाणे HP 14 या मॉडेलमध्ये देखील 13th Gen Intel Core i3 या प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही लॅपटॉप फूल-एचडी रिझोल्यूशन (1920x1080 पिक्सेल) सह येतात. दोन्हीमध्ये फूल एच-डी मॅन्युअल वेबकॅम शटर असून वाय-फाय 6 सपोर्ट व फिंगरप्रिंट देण्यात आले आहे. HP 14 ची किंमत 39,999 रुपयांपासून सुरू होते. HP 15 ची किंमत 48,000 रुपयांपेक्षा जास्त आहे.

HP Pavilion Plus 14

या लॅपटॉपमध्ये 16GB RAM आणि 512GB SSD यांचा समावेश करण्यात आला आहे. PD (पॉवर डीलीव्हरी) चार्जिंगला सपोर्ट करणारी 51Wh बॅटरी यात देण्यात आली आहे. तसेच या  मॉडेलमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 2.8K (2880x1880 पिक्सेल) रिझोल्यूशनसह 14-इंचाचा OLED डिस्प्ले हे फीचर आहे. पॅव्हिलियन प्लस 14 मध्ये टेम्पोरल नॉइज रिडक्शन आणि इंटिग्रेटेड ड्युअल-अॅरे डिजिटल मायक्रोफोन्ससह 5-मेगापिक्सेल वेबकॅमचा समावेश आहे. भारतात त्याची किंमत 81,999 रुपयांपासून सुरू होते.

HP Pavilion X360

या लॅपटॉपचा डिस्प्ले 180 अशांत फिरवता येतो, ज्यामुळे वापरकर्ते लॅपटॉपला टॅबलेट म्हणूनही वापरू शकतात. त्यात एक स्टायलसही देण्यात आला आहे.  या लॅपटॉपमध्ये Intel Core i5-1335U हे शक्तिशाली प्रोसेसर कंपनीने दिले आहे. यासोबत 16GB DDR4 रॅम आणि 1TB SSD  कॉन्फिगरेशनसह हे लॅपटॉप खरेदी करता येणार आहे. यात 250 nits ब्राइटनेससह फुल-एचडी 14-इंचाचा IPS डिस्प्ले आहे. Pavilion X360'ची भारतात किंमत रु.57,999 पासून सुरू होते.