परदेशात शिक्षण घेण्यासाठी लाखो भारतीय विद्यार्थी उत्सुक असतात. अमेरिका, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 2024 साली परदेशात शिक्षण घेण्यासाठी दहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी जातील असा अंदाज आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तर व्हिसा मिळण्यासाठी वर्षभर प्रतिक्षा करावी लागत आहे. मागील काही वर्षांपासून ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी वाढली आहे. त्यामुळे ब्रिटनने यंग इंडिया प्रोफेशनल ही योजना भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे.
ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहून पंतप्रधान ऋषी सुनक यांनी यंग इंडिया प्रोफेशनल ही योजना सुरू केली आहे. जानेवारी 2023 पासून ही योजना सुरू झाली आहे.
या योजनेअतंर्गत 18 ते 30 वयोगटातील 3 हजार पदवीधर भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा देण्यात येईल. याअंतर्गत निवड झालेले विद्यार्थी 2 वर्ष युनायटेड किंगड्ममध्ये 2 वर्षापर्यंत राहू शकतात, तसेच काम करु शकतात. ही योजना यु के च्या विद्यार्थ्यांसाठीही लागू आहे. म्हणजे 3 हजार ब्रिटनमधील विद्यार्थी भारतामध्ये शिक्षणासाठी व्हिसावर येऊ शकतात. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे असल्याचे येत्या काळात दोन्ही देश आणखी जवळ येण्याची शक्यता आहे.
स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करण्याची अट?
1)तुमचे वय 16 वर्षांपेक्षा जास्त असावे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत तुमचे अॅडमिशन झालेले असावे
2)इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. इंग्रजी भाषा बोलता, लिहता आणि वाचता यायला हवी.
3) शैक्षणिक शुल्क आणि राहण्याचा खर्च भरण्याची तयारी असावी.
4) 16 वर्षांपेक्षा कमी वय असेल तर पालकांची परवानगी आवश्यक
परदेशात शिक्षण घेण्यासाठी व्हिसा मिळण्यात अडचणी
अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्यास व्हिसा मिळण्यासाठी तब्बल 1 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. व्हिसासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्यामुळे काऊंसलेट कार्यालयावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने दिरंगाई होत आहे. पर्यटन आणि व्यावसायिक व्हिसा मिळण्यास आधीपासूनच प्रतिक्षा कालावधी होता. मात्र, आता विद्यार्थ्यांना व्हिसा मिळण्यातही अडचणी येत आहेत. हैदराबाद येथील काऊंसलेट कार्यालयाकडून व्हिसा मिळण्यात तब्बल 325 दिवसांचा प्रतिक्षा कालावधी दाखवण्यात येत आहे. दुसऱ्या काऊंसलेट कार्यालयाद्वारे अर्ज करण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांकडे आहे. मात्र, सर्वच विभागीय कार्यालयांचा वेटिंग पिरियड जास्त आहे.