Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Transfer Options: क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे आहे? या सोप्या पद्धतींचा करा वापर

Money Transfer Options

Money Transfer Options: क्रेडिट कार्ड अडीअडचणीच्या वेळी कामी येते. हे सर्वांना माहिती आहे. कारण, क्रेडिट कार्डमुळे पैशांची कमी जाणवत नाही. तुम्ही त्याचा वापर करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल. मात्र, तुम्हाला एखाद्या कामासाठी क्रेडिट कार्डवरुन व्यवहार करता येत नसेल तेव्हा अशावेळी पैसे ट्रान्सफर करणे हाच पर्याय उरतो. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

Transfer Money From Credit Card To Bank Account: क्रेडिट कार्डचा वापर करताय म्हटल्यावर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल. कारण, क्रेडिट कार्ड लाईफ इन्शुरन्स आणि गहाण ठेवताना, या व्यवहारासाठी कार्ड स्वीकारले जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला अशा व्यवहारांसाठी पैसे हवे असल्यास तुम्ही क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकता. तसेच, एखादी इमर्जन्सी असेल तेव्हा देखील या सुविधेचा वापर तुम्ही करु शकता.

या पद्धतींचा वापर करुन करा पैसे ट्रान्सफर

  • डायरेक्ट ट्रान्सफर :

सध्या बऱ्याच बँका आपल्याला त्यांच्या ऑनलाईन बॅंकिंग अ‍ॅप किंवा वेबसाईटचा वापर करून आपल्या क्रेडिट कार्डमधून थेट आपल्या बॅंक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देतात. फक्त याआधी बॅंकांमध्ये रोजच्या ट्रान्सफरसाठी काही मर्यादा आहे का हे चेक करणे गरजेचे आहे. कारण, काही बॅंकामध्ये ट्रान्सफरसाठी मर्यादा असू शकते. त्यामुळे याविषयी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या बॅंकेत संपर्क करु शकता.

  • नेट बॅंकिंग :

जर तुमची बॅंक नेट बॅंकिंगची सेवा देत असेल तर तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करू शकता आणि 'क्रेडिट कार्ड' सेक्शनमध्ये अ‍ॅक्सेस मिळवू शकता. त्यानंतर 'ट्रान्सफर' हा पर्याय निवडून तुम्ही तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करावयाची रक्कम टाकू शकता. त्यानंतर सूचनांना फाॅलो करा आणि व्यवहार पूर्ण करा.

  • फोन कॉल :

तुम्ही काही क्रेडिट कार्डवरुन फोन काॅलवर देखील पैसे तुमच्या बॅंक खात्यात ट्रान्सफर करु शकता. कारण, याची सुविधा काही क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला देतात. महत्वाची माहिती देण्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क करा आणि पैसे ट्रान्सफर करण्याचा हेतू त्यांना सांगा. तसेच, काॅलदरम्यान त्यांना ट्रान्सफर करायच्या रकमेची पुष्टी करा. लगेच तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतील.

  • चेकचा पर्याय निवडू शकता :

आणखी महत्वाचा पर्याय म्हणजे, स्वतःच्या नावाचा चेक लिहिणे होय. यासाठी तुम्ही प्राप्तकर्त्याच्या जागी सेल्फ लिहा. तसेच, महत्वाच्या माहितीचा समावेश करा, जी चेक भरताना आवश्यक असते. त्यांनतर तुमचे ज्या बॅंकेत खाते आहे. त्या बॅंकेत तो चेक नेऊन जमा करा. काही वेळाने तुमच्या बॅंक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील.

तुम्हाला एखाद्यावेळी इमर्जन्सी आली तेव्हा तुम्ही या पद्धतींचा वापर करुन, तुम्हाला जी सोपी वाटते तीच्याद्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरुन बॅंक खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकता. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि झटपट तुम्हाला पैसेही मिळतील.