Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रेडिट कार्डने बँक खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करायचे?

Transfer Money from Credit Card to Bank Account

क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे पर्याय तर उपलब्ध आहेत. पण ही योग्य पद्धत मानली जात नाही आणि यामुळे तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो. कसा ते जाणून घ्या.

क्रेडिट कार्डमुळे खरेदीचा मनमुराद आनंद घेता येतो. जसे की, तुमच्याकडे रोख रक्कम किंवा पुरेसे पैसे नसतानाही तुम्ही एखादी वस्तू विकत घेऊ शकता. त्याचबरोबर क्रेडिट कार्डने खरेदी केल्यावर वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभ घेता येतो. पण काही वेळा अशी परिस्थिती येते की, तिथे तुम्हाला रोख रक्कम देऊनच व्यवहार करावे लागतात. पण क्रेडिट कार्डने तुम्ही पैसे काढले तर त्यावर तुम्हाला भरपूर चार्ज भरावा लागतो. अशावेळी तुम्ही क्रेडिट कार्डमधून तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करून मग त्यातून पेमेंट करू शकता. पण हे करणार कसे? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. चला तर मग याची प्रक्रिया जाणून घेऊ.

क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे पर्याय तर उपलब्ध आहेत. पण त्याचबरोबर ऑनलाईन ट्रान्सफर करण्याचेही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी अनेक जण खाते असलेल्या बँकेचे मोबाईल बँकिंग अॅप (Mobile Banking App) वापरतात. त्याचबरोबर ई-वॉलेट (E-Wallet), पेटीएमचा (Paytm) वापर करून क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.

ई-वॉलेट

  • सर्वप्रथम तुम्हाला माहित असलेले कोणतेही मोबाईल अॅप किंवा डिजिटल वॉलेट मोबाईलमध्ये डाऊनलोड करा.
  • वॉलेटच्या बॅलन्स सेक्शनमध्ये जा.
  • आता Add Money to Wallet यावर क्लिक करा.
  • हवी असलेली रक्कम टाका आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी क्रेडिट कार्ड निवडा.
  • सर्व सूचनांचे पालन करा आणि ट्रान्सफर कन्फर्म करा.
  • वॉलेटमध्ये जमा झालेल्या पैशांतून हवे ते बिल भरा.


पेटीएमने क्रेडिट कार्डमधून बँकेत पैसे जमा करा

  • Paytm Mobile App डाऊनलोड करून लॉगिन करा.
  • ट्रान्सफर फंडमध्ये जाऊन क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटला पैसे ट्रान्सफर करा.
  • त्यानंतर वॉलेटमधील पासबुकवर क्लिक करा.
  • पासबूकमधून Send Money to Bank हा पर्याय निवडा आणि ट्रान्सफरवर क्लिक करा.
  • आता पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँकेचे डिटेल्स टाका.
  • भरलेली माहिती Verify करा आणि पैसे सेंड करा.


अशाप्रकारे पैसे ट्रान्सफर केल्यानंतर काही वेळात तुमच्या क्रेडिट कार्डमधून पैसे बँक खात्यात जमा होतात. अशाच पद्धतीने मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या मदतीने तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता.

ऑफलाईन पद्धताने पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर बँकेत चेक देऊन क्रेडिट कार्डमधून पैसे बँक खात्यात जमा होऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही एटीएममधून पैसे Withdraw करून ते बँक खात्यात जमा करू शकता.

क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करावे का?

क्रेडिट कार्डने एटीएममधून पैसे काढणे किंवा कार्डमधील पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करणे ही योग्य पद्धत मानली जात नाही. यामुळे तुम्हाला क्रेडिट कार्डवर जास्त फी किंवा इंटरेस्ट भरावा लागू शकतो. त्यामुळे असे करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.

कारण क्रेडिट कार्डचा उद्देश हा पेमेंट करणे  हा आहे. त्यामुळे कार्डचा वापर करून पेमेंट केल्यावर बँका अशा ग्राहकांना चांगल्या सुविधा आणि ऑफर देते. पण तुम्ही जर कार्डमधून पैसे खात्यात जमा केले तर बँका अशा ग्राहकांवर नजर ठेवून असतात. यासाठी ते कार्डधारकांकडून 
अतिरिक्त शुल्कसुद्धा आकारतात आणि याचा विपरित परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो. त्याचबरोबर सातत्याने क्रेडिट कार्डमधून बँकेत पैसे ट्रान्सफर करणे सुरू ठेवले तर इन्कम टॅक्स विभागाकडून तुम्हाला नोटीस येऊ शकते.

क्रेडिट कार्डमधून पैसे ट्रान्सफर करता येत असले तरी त्याचा वापर करणे हे महागडे ठरू शकते. यामुळे तुम्हाला आर्थिक भुर्दंडदेखील पडू शकतो. त्यामुळे खूपच आवश्यकता असेल तरच या सुविधेचा वापर करणे योग्य ठरू शकते.