Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Low Budget Business Idea: कमी बजेटमध्ये बिझनेस सुरू करायचा आहे? मग 'हे' बिझनेस करा ट्राय!

Low Budget Business Idea: कमी बजेटमध्ये बिझनेस सुरू करायचा आहे? मग 'हे' बिझनेस करा ट्राय!

Image Source : www.fine2buy.com

बिझनेस सुरू करायची इच्छा प्रत्येकाची असते. पण, कसा सुरू करायचा? कोणता सुरू करायचा? याविषयी माहिती राहत नाही. तसेच, किती खर्च लागेल हाही मुद्दा असतोच. आज आम्ही तुमच्यासाठी काही बिझनेस घेऊन आलो आहोत. जे अगदी कमी बजेटमध्ये तुम्हाला सुरू करता येणार आहेत.

मार्केटमध्ये फूड बिझनेसला जास्त मागणी आहे. ती मागणी कमी होणारी नसून फक्त वाढणारी आहे. त्यामुळे फूडशी संबंधित कोणताही बिझनेस सुरू केला तर तो कधीच घाट्यात येणार नाही. तसेच, तो सुरू करण्यासाठी जास्त पैसे लागत नाही. फक्त मेहनत करण्याची तयारी पाहिजे. आपल्यासमोर बरेच उदाहरणे आहेत. ज्यांनी छोट्या बिझनेसची सुरूवात केली आणि आज मोठ्या फर्मचे मालक आहेत. त्यामुळे बिझनेस हा छोट्यापासूनच मोठा होत असतो. याच शास्त्राला धरून आम्ही तुमच्यासाठी काही बिझनेस घेवून आलो आहोत, जे कमी बजेटमध्ये आणि कधीही सुरू करता येणारे आहेत.

बेकरी बिझनेस

भारतात चहा ब्रेड पोटात गेल्याशिवाय बऱ्याच लोकांची सकाळ होत नाही. त्यामुळे बेकरीशी संबंधित बिझनेस सुरू करायचे ठरवल्यावर त्यात तोटा होणार नाही. हेही तेवढेच खरे आहे. कारण, बेकरीच्या प्राॅडक्टची मागणी बाराही महिने सारखीच असते. यात सर्वांत जास्त केक, पेस्ट्री, टोस्ट, बन व इतरही बेक केलेल्या पदार्थाची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे, सध्या बरेच लोक या बिझनेसमध्ये उतरली असून चांगला नफा कमवत आहेत. तुम्हीसुद्धा हा बिझनेस खूप कमी बजेटमध्ये सुरू करू शकता. कारण, हे सर्व पदार्थ तुम्ही एखाद्या मोठ्या बेकरीमधून विकत घेवू शकता. तसेच, तुम्ही ते सर्व पदार्थ ऑनलाईनही विकू शकता किंवा घरीच छोटे स्टोअर उभारू शकता. त्यामुळे, तुम्हाला हे पदार्थ स्टोअर करायची गरज नाही. जशी गरज असेल तसे पदार्थ तुम्ही मागवू शकता. हा बिझनेस सुरू करायला तुम्हाला अंदाजे 15 हजार रुपये लागू शकतात. पण, कमाई पाहिली तर महिन्याला तुम्ही जास्तीतजास्त 30 हजार रुपये ते 80000 रुपयांपर्यंत कमवू शकता.   

 क्लाऊड किचन बिझनेस

क्लाऊड किचन कोरोना काळात वाढीस आले आणि आता याच्या वाढीने जोर धरला आहे. प्रत्येक शहरात क्लाऊड किचन जागोजागी पाहायला मिळत आहे. कारण, हाॅटेलच्या तुलनेत त्याचा खर्च कमी असून कमाई जास्त आहे. त्यामुळे, हा बिझनेस सुरू करण्याचा कोणताच हंगाम नाही. तुम्ही कधीही हा बिझनेस सुरू करू शकता. क्लाउड किचन हाॅटेलसारखेच असते, फक्त तिथे जाऊन आपल्याला जेवण करता येत नाही. तुम्ही तेथून तुम्हाला हवा तो पदार्थ ऑनलाईन अॅपद्वारे, फोनवरून मागवू शकता. यामुळेच हा बिझनेस सुरू करायचा खर्च कमी आहे. तरीही तुम्हाला किचनसाठी प्रशस्त जागा आणि चांगले स्वयंपाकी लागतील. हा बिझनेस  तुम्ही अंदाजे 1 लाखात सुरू करू शकता. कमाई महिन्याला अंदाजे 1 लाख 50 हजार रुपये ते 3 लाखापर्यंत होऊ शकते. त्यामुळे लाखभर रुपये गुतंवण्याची तयारी असणारे या बिझनेसमध्ये पाय ठेवू शकतात.

कपड्यांचा बिझनेस

ज्यांना कपड्यांची आणि क्रिएटिव्ह गोष्टी करण्याची आवड आहे. ते फक्त 1 लाख रुपयांमध्ये टी-शर्ट प्रिंटींगच्या बिझनेसमध्ये उतरून लाखो रुपये कमाऊ शकतात. टी-शर्ट प्रिंट करायच्या मशिन्स हव्या त्या किमतीमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार त्या विकत घेऊ शकता. त्याचप्रमाणे मार्केटमधून तुम्ही व्होलसेल भावाने टी-शर्ट खरेदी करू शकता. एकदा सगळा सेटअप झाल्यावर घरीच डिझाईन करून किंवा त्यावर कोट्स लिहून त्या ऑनलाईनही तुम्ही विकू शकता. तसेच, बिझनेस वाढवण्यासाठी स्टार्टअप, छोट्या कंपन्या यांच्याकडून ऑर्डर घेवून, त्यांना हव्या तश्या डिझाईन काढून तुम्ही त्या विकू शकता. त्याचबरोबर यापेक्षा कमी बजेटमध्ये म्हणजेच 20 हजार रुपयात हा बिझनेस सुरू करायचा असल्यास, व्होससेलमधून कपडे आणून तुम्ही ते ऑनलाईन विकू शकता. त्यातूनही चांगला नफा कमावता येवू शकतो.

फूड ट्रक बिझनेस

सध्या मार्केटमध्ये फूड ट्रकची चलती आहे. कारण, लोकांजवळ जास्त वेळ नाही, त्यात त्यांना हलके-फुलके खायचे असते. त्यामुळे फूड ट्रक टाकून तुम्ही लोकांना आकर्षित करणारे पदार्थ ठेवून चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्ही एखादी जुनी गाडी घेवून तिला चांगल्या पद्धतीने तयार करू शकता. एकदा गाडी बनल्यावर तुम्ही त्या गाडीवर स्नॅक्स, फास्ट फूड, पिझ्झासारखे पदार्थ ठेवू शकता. यासाठी फक्त तुम्हाला रोजचा भाजीपाला, अंडी, तेल तसेच, इतरही साहित्य खरेदी करावे लागेल. सुरूवातीला तुम्हाला खर्चाचा व साहित्याचा अंदाज यायला थोडा वेळ लागेल. मात्र, एकदा अंदाज आल्यावर तुमचा इतर साहित्यावर जास्त खर्च होणार नाही. हा बिझनेस तुम्ही जास्तीतजास्त 1 लाख रुपयात सुरू करू शकता. फक्त फूड ट्रक बनवायला तुम्हाला जास्त खर्च येवू शकतो. तसेच, लायसन्ससाठी थोडा खर्च करावा लागेल. कारण, रोज लागणारे साहित्य जास्त महाग होणार नाही आहे. त्यामुळे चांगले मॅनजमेंट करून तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता.