Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Food Business With zomato : जाणून घ्या, झोमॅटोवर तुमचा फूड बिझनेस कसा सुरू करायचा? कसे करायचे रजिस्ट्रेशन?

Food Business With zomato : जाणून घ्या, झोमॅटोवर तुमचा फूड बिझनेस कसा सुरू करायचा? कसे करायचे रजिस्ट्रेशन?

अलीकडच्या काळात अनेक खाद्य पदार्थ विक्रेते, हॉटेल्स झोमॅटोसह आपला व्यवसाय वाढवण्यासाठी इच्छुक आहेत. शहरी भागात तुम्ही देखील उत्कृष्ट खाद्य पदार्थाची झोमॅटोच्या सहाय्याने ऑनलाईन विक्री करू शकता. आज आपण झोमॅटो (Zomato) सोबत ऑनलाइन तुमचा फूड बिझनेस कसा सुरू करायचा याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या सेवा देणाऱ्या कंपन्यांमुळे फूड बिझनेसला सुगीचे दिवस आले आहेत. या फूड डिलिव्हरीच्या सुविधेमुळे घरीच खाद्यपदार्थ मागवणाऱ्या खवय्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे फूड डिलिव्हरी आणि फूड बिझनेस या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक बनल्या आहेत. आज आपण झोमॅटो (Zomato) सोबत ऑनलाइन तुमचा फूड बिझनेस कसा सुरू करायचा याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

झोमॅटोसोबत फूड व्यवसाय-

Zomato ही ऑनलाइन फूड बिझनेस क्षेत्रातील नावाजलेली सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. जगभरातील 24 देशामधून झोमॅटो फूड डिलिव्हरीची सेवा देते. त्यामुळे अलीकडच्या काळात अनेक खाद्य पदार्थ विक्रेते, हॉटेल्स झोमॅटोसह आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पाऊल उचलत आहेत. तुम्ही जर रेस्टारंट सुरू केले असेल आणि तुम्हालाही खाद्यपदार्थ ऑनलाईन तुमच्या ग्राहंकापर्यंत पोहोचवयाचे असेल, तर तुम्ही झोमॅटोसारख्या फूड डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यासोबत जोडले जाऊ शकता. झोमॅटोसोबत तुमचा फूड व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पुढील काही गोष्टींची पुर्तता करावी लागेल.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

झोमॅटोसोबत तुमच्या व्यवसाची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पुढील काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. 

  • भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)चे परवाना प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • व्यवसायाचे कंपनी नोंदणी प्रमाणपत्र (खासगी असेल किंवा भागीदारी)जीएसटी क्रमांक (लागू असल्यास)
  • पॅन कार्डची प्रत
  • बँक खाते तपशील

यासह तुम्ही कोणकोणते पदार्थ विक्री करणार आहात किंवा तुमच्या कोणकोणते खाद्यपदार्थ उपलब्ध असतील याची यादी तुम्हाला द्यावी लागेल. तसेच तुम्ही तुमच्या फूड व्यवसायामधील मुख्य 5 पदार्थांचे फोटो तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक आहेत.

कशी कराल नोंदणी?

झोमॅटोसोबत व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला झोमॅटोच्या संकेतस्थळावर जावे लागेल

  • या ठिकाणी तुम्हाला रेस्टारंटची नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी टाकून लॉगिन करा
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या रेस्टारंटचे पेज तयार करायचे आहे
  • यासाठी तुम्हाला तुमच्या रेस्टारंटचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती भरायची आहे
  • तसेच तुमच्या रेस्टारंटची वेळ प्रकार व्हेज-नॉनव्हेज यासह इतर सर्व तपशील भरायचा आहे.
  • तसेच तुमचा FSSAI, जीएसटी क्रमांक, पॅन क्रमांक रेस्टारंटचे फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहेत. 
  • त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

रेस्टारंटची माहिती अपडेट करा-

रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Zomato कंपनीकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाते. त्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी कंपनीकडून संपर्क साधण्यात येतो. पडताळणी नंतरची तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला Zomato Partner या संकेतस्थळावर तुमच्या रेस्टारंटचे पेज दिसेल. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या रेस्टारंटमधील खाद्य पदार्थ, त्याची किंमत इत्यादी माहिती अपडेट करू शकता. त्यानंतर तुम्हाला ग्राहकांकडून ऑर्डर मिळण्यास तुम्ही पात्र ठरू शकता.