Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPFO UAN Registration: ऑनलाईन UAN क्रमांक रजिस्टर्ड आणि अ‍ॅक्टिव्हेट कसा करायचा, जाणून घ्या!

Generate & Activate UAN Number

EPFO UAN Registration: युनिव्हर्सल अकाउंट नंबर (Universal Account Number-UAN) हा एक 12 अंकी क्रमांक आहे; जो पीएफ खाते असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दिला जातो. या क्रमांकाच्या मदतीने कर्मचारी ईपीएफ खात्याशी संबंधित माहिती पाहू शकतो. हा क्रमांक रजिस्टर्ड आणि अ‍ॅक्टिव्हेट कसा करायचा, हे आपण पाहणार आहोत.

EPFO UAN Registration: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे खाते असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (Universal Account Number-UAN) दिला जातो. या नंबरच्या मदतीने कर्मचारी ईपीएफ खात्याशी संबंधित माहिती पाहू शकतो किंवा त्या खात्यावरून व्यवहार करू शकतो. आज आपण ईपीएफ खाते कसे हाताळतात. तसेच त्याला आवश्यक असणारा UAN क्रमांक जनरेट आणि अ‍ॅक्टिव्हेट कसा करायचा, हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा, 1952 (Employee's Provident Funds and Miscellaneous Provisions Act, 1952) मधीर तरतुदीनुसार एका कंपनीत 20 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असतील तर संबंधित कंपनीला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेंतर्गत कर्मचाऱ्याला त्याच्या बेसिक पगाराच्या किमान 12 टक्के योजनेमध्ये जमा करावी लागते. यात कंपनीसुद्धा तेवढाच वाटा कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करते.

युनिव्हर्सल अकाउंट नंबर (Universal Account Number-UAN) हा एक 12 अंकी क्रमांक आहे; जो पीएफ खाते असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दिला जातो. या क्रमांकाच्या मदतीने कर्मचारी ईपीएफ खात्याशी संबंधित माहिती पाहू शकतो किंवा त्या खात्यावरून व्यवहार करू शकतो. कर्मचाऱ्यांनी एखादी कंपनी बदलली तर दुसऱ्या कंपनीत त्यांचे नवीन मेंबर आयडी (Member Identification Numbers) तयार होते. पण त्यांचा UAN क्रमांक मात्र बदलत नाही. तो तसाच राहतो.

UAN अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यासाठी आवश्यक असलेला UAN क्रमांक नोंदवण्यासाठी आणि तो अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी खालील कागदपत्रांची गरज भासते.

 • बॅंकेची संपूर्ण माहिती (खाते क्रमांक, ब्रान्च, आयएफएससी कोड इत्यादी)
 • पॅनकार्ड (कर्मचाऱ्याचे पॅनकार्ड UAN क्रमांकाशी लिंक केले जाते.)
 • आधारकार्ड (मोबाईल क्रमांक बॅंक खाते आणि आधारकार्डशी कनेक्ट असणे गरजेचे आहे.
 • घराचा पत्ता असलेला पुरावा

UAN पोर्टलद्वारे UAN क्रमांक जनरेट करा

Create UAN number thugh epfo portal
Source: epfo portal

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेद्वारे प्रत्येक खातेधारकाला UAN क्रमांक दिला जातो. हा युएएन क्रमांक कंपनीद्वारे कर्मचाऱ्याला दिला जातो. कर्मचाऱ्यांचा UAN रजिस्टर करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.


अशाप्रकारे कर्मचाऱ्याचा UAN जनरेट होऊन तो लगेच पीएफ खात्याशी जोडला जाऊ शकतो. ही प्रक्रिया पार पाडताना, कंपनीने कर्मचाऱ्याची संपूर्ण माहिती नोंदणी करताना व्यवस्थित टाकणे गरजेचे आहे. जेणेकरून एकच क्रमांक दोन कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही. जर कर्मचाऱ्याजवळ अगोदरच UAN क्रमांक असेल तर तो नवीन कंपनीत सबमिट करावा.

कर्मचाऱ्यांना UAN क्रमांक देणे, हे कंपनीचे काम आहे. पण काही वेळेस कंपनीकडून कर्मचाऱ्याला UAN क्रमांक दिला गेला नाही. तर कर्मचारी त्याच्या मेंबर आयडी, पॅनकार्ड, आधारकार्डच्या मदतीने पुढीलप्रमाणे UAN क्रमांक मिळवू शकतो.

 • सर्वप्रथम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या वेबसाईटला भेट द्या.
 • होमपेजवरील 'Know Your UAN Status' यावर क्लिक करा.
 • इथे आवश्यक माहिती भरा (पॅनकार्ड किंवा आधाराकार्ड किंवा मेंबर आयडी)
 • त्यानंतर 'Get Authorization Pin' यावर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.
 • ओटीपी टाकून व्हेरिफाय करा आणि तुमच्या UAN ची माहिती चेक करा.


UAN पोर्टलद्वारे UAN क्रमांक अ‍ॅक्टिव्हेट करा

कर्मचारी UAN पोर्टलवरून त्यांचा UAN क्रमांक पुढीलप्रमाणे अ‍ॅक्टिव्हेट करू शकतात.

UAN Activation Through the UAN Portal
Source: epfo portal

UAN eSewa पोर्टलला भेट द्या.

 • पोर्टवरून 'Activate UAN' लिंकवर क्लिक करा.
 • इथे आता आवश्यक माहिती भरा (पॅनकार्ड, आधारकार्ड किंवा मेंबर आयडी)
 • माहिती भरल्यानंतर 'Get Authorization Pin'वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबर ओटीपी येईल.
 • ओटीपी टाका आणि Activate UAN यावर क्लिक करा, तुमचा UAN अ‍ॅक्टिव्हेट होईल.


UAN क्रमांक अ‍ॅक्टीव्हेट करण्याची प्रोसेस पूर्ण झाली की, कर्मचाऱ्याच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर पासवर्ड येतो. अशाप्रकारे कर्मचारी UAN क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने e-SEWA पोर्टलवरून ईपीएफशी संबंधित सेवांचा लाभ घेऊ शकतात.


UAN नंबरला आधार लिंक करा

ईपीएफच्या पोर्टलवर जा
UAN क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या.
लॉगिन केल्यानंतर 'KYC'मध्ये 'Manage' टॅबवर क्लिक करा.
इथे 'Aadhar' हा पर्याय निवडा.
आधारकार्डवरील नाव आणि आधार क्रमांक टाकून सेव्ह करा.