Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Pay Gift card : ॲमेझॉन गिफ्ट कार्ड रिडीम कसे करायचे?

Amazon Pay Gift card : ॲमेझॉन गिफ्ट कार्ड रिडीम कसे करायचे?

ॲमेझॉन पे गिफ्ट कार्ड हे एक प्रकारचे डिजिटल व्हाऊचर आहे. हे तुम्हाला गिफ्ट मिळू शकते किंवा तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. यामध्ये 50 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंतची रक्कम तुम्ही एखाद्या व्यक्तीला गिफ्ट करू शकता. हे गिफ्ट कार्ड तुम्हाला ईमेलच्या माध्यमातूनही पाठवू शकता.

ॲमेझॉन ही ई कॉमर्स कंपनी आता सर्वाच्या सोयीची आणि सवयीची झाली आहे. कोणतीही गोष्ट ऑनलाईन खरेदी करायची असेल तर प्रत्येकाला ॲमेझॉन हा पर्याय सर्वप्रथम सुचतो. ॲमेझॉन ऑनलाईन विक्री करणाऱ्या व्यावसायिक वेबसाईटवर तुम्हाला खेरदी बरोबरच अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक सुविधा म्हणजे ॲमेझॉन गिफ्ट कार्ड, हे गिफ्ट कार्ड तुम्ही दुसऱ्याला पाठवू शकता किंवा तुम्हाला कोणाकडून प्राप्त झाल्यास त्या माध्यमातून तुम्ही खरेदी करू शकता. मात्र, बऱ्याच वेळेला ॲमेझॉन पे कार्ड रिडीम ( Gift Voucher Redeem) कसे करायचे अथवा दुसऱ्या कसे पाठवायचे याबाबत माहिती नसते. आज आपण ॲमेझॉन गिफ्ट कार्ड कशाप्रकारे रिडीम करायचे याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

काय आहे ॲमेझॉन पे गिफ्ट कार्ड-

ॲमेझॉन पे गिफ्ट कार्ड हे एक प्रकारचे डिजिटल व्हाऊचर आहे. हे तुम्हाला गिफ्ट मिळू शकते किंवा तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. यामध्ये 50 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंतची रक्कम तुम्ही एखाद्या व्यक्तीला गिफ्ट करू शकता. हे गिफ्ट कार्ड तुम्हाला ईमेलच्या माध्यमातूनही पाठवू शकता. यासाठी तुम्हाला एक कोड मिळालेला असतो. त्या कोडचा वापर करून ती गिफ्ट कार्डमधील रक्कम तुम्ही तुमच्या ॲमेझॉनच्या खात्यात जमा करू शकता. त्यालाच गिफ्ट कार्ड रिडीम ( Gift Voucher Redeem) करणे असे म्हटले जाते.

रिडीम कसे करायचे-

ॲमेझॉन पे गिफ्ट कार्ड तुम्हाला कार्डच्या स्वरुपात किंवा ईमेलच्या स्वरुपात प्राप्त होते. त्यातील गिफ्ट करण्यात आलेली रक्कम तुम्हाला त्या कार्डच्या डिटेल्समध्ये दिसून येईल. तुम्हाला ती रक्कम तुमच्या ॲमेझॉन पे (Amazon Pay) खात्यामध्ये जमा करायची आहे. तुम्हाला तुमचे गिफ्ट कार्ड रिडीम करण्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

  • सुरुवातीला तुम्ही ॲमेझॉन ई कॉमर्सच्या वेबसाईटवर जा
  • या ठिकाणी ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक टाकून तुमचे खाते लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर Amazon Pay हा ऑप्शन दिसेल.
  • तसेच तु्म्ही वेबसाईटच्या सर्च बॉक्मध्ये Amazon Pay Balance असे देखील सर्च करू शकता
  • Amazon Pay Balance या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Amazon Pay हा पर्याय दिसेल
  • तुम्हाला या ठिकाणी Add Money आणि Add Gift Card हे दोन पर्याय दिसतील
  • तुम्हाला Add Gift Card  या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या गिफ्ट कार्डवर दिलेला स्क्रॅच कोड टाका
  • यानंतर तुम्हाला तुमच्या  Amazon Pay Balance मध्ये तुमच्या गिफ्ट कार्डची रक्कम दिसेल


ॲमेझॉन गिफ्ट कार्डच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या डिजिटल रकमेच्या माध्यमातून तुम्ही ॲमेझॉनच्या वेबसाईटवर काहीही खरेदी करू शकता. जेवढी रक्कम रिडीम केल्यानंतर तुमच्या ॲमेझॉन बॅलन्समध्ये जमा होईल ती पूर्ण रक्कम तुम्ही वापरू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळचे पैसे वापरण्याची गरज नाही. तसेच तुम्ही ही रक्कम इन्शुरन्स, कॅब भाडे, फूड डिलिव्हरी, लाईट बिल किंवा रिचार्ज, इत्यादींसह Amazon Pay बॅलन्स वापर करू शकता.

गिफ्ट कार्ड कसे पाठवायचे?

ज्या प्रमाणे तुम्ही गिफ्ट कार्ड वापरू शकता. त्याप्रमाणे तुम्ही इतरांना गिफ्ट कार्ड पाठवू देखील शकता.

  • Amazon Pay Balance या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Purchase Gift card हा पर्याय दिसेल
  • त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचा ईमेल आयडी टाकायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला किती रक्कम गिफ्ट करायची आहे ती रक्कम जमा करायची आहे
  • त्यानंतर तुम्ही तो ईमेल संबंधित व्यक्तीला पाठवू शकता.