Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dormant Bank Account: बंद पडलेले बँक खाते पुन्हा कसे सुरू करावे? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

dormant bank account

Image Source : www.in.pinterest.com

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आकडेवारीनुसार देशात 10.24 कोटी निष्क्रिय बँक खाती आहेत. या खात्यांमध्ये 34 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम पडून आहे. काही कारणास्तवर जर तुमचे बँक खाते बंद पडले असेल तर ते तुम्ही पुन्हा सुरू करू शकता. जाणून घ्या बंद बँक खाते पुन्हा सुरू करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे.

Dormant bank account: अनेक नागरिकांकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. त्यातील काही खाती अशी असतात जी खूप दिवसांपासून वापरलेली नसतात. म्हणजेच ही खाती बंद पडलेली असतात. नोकरी बदलल्यावर जुने सॅलरी खाते, एका शहरातून दूसऱ्या शहरात वास्तव्यास गेल्यास किंवा दुर्दैवी प्रसंगी एखाद्याचा मृत्यू झाल्यास व्यक्तीचे बँक खाते निष्क्रिय होते. यामागे इतरही अनेक कारणे आहेत. 

भारतामध्ये असे निष्क्रिय झालेली अनेक खाती आहेत. (how to activate dormant bank account) यामध्ये कोट्यवधींनी पैसे देखील पडून आहे. मात्र, तुमचे जर असे बंद पडलेले खाते असेल तर तुम्ही ते पुन्हा सुरू करू शकता. होय खरं आहे. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून हे खाते पुन्हा सुरू करू शकता. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास या खात्यातील रक्कम वारसदारांना मिळवताही येते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार देशात 10.24 कोटी निष्क्रिय खाती आहेत. या खात्यांमध्ये 34 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम विना दावा पडून आहे. म्हणजेच खातेधारकाने या बँक खात्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. जर तुमचे असे एखादे खाते असेल तर तुम्ही ते पुन्हा सुरू करु शकता. नुकतेच आरबीआयने पतधोरणात जाहीर केले आहे की, अशी बंद खात्याची माहिती एकाच पोर्टलवर ग्राहकांना पाहायला मिळतील. नाव आणि KYC डिटेल्स टाकून तुम्ही चेक करू शकता.

बंद पडलेले खाते सुरू करण्याची प्रक्रिया काय?

1)ज्या बँक शाखेत तुमचे खाते होते त्या शाखेत जाऊन खाते पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज करा. यामध्ये खाते कोणत्या कारणामुळे बंद झाले होते ते नमूद करा. 
2) जर संयुक्त खाते असेल तर सर्व खातेधारकांना अर्जावर सही करावी लागेल. 
3) आधार, पॅन, पत्ता सह आवश्यक KYC कागदपत्रे बँकेकडे जमा करा. खातेधारकाचा पासपोर्ट साइज फोटो सोबत ठेवा. 
4) पडताळणीसाठी सर्व ओरिजनल सत्यापित कागदपत्रे सोबत ठेवा. 
5) काही बँका KYC पडताळणीसाठी बायमेट्रिक सिस्टिमचा वापर करतात. 
6) सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यास बंद पडलेले खाते सुरू होईल. 
7) सर्वसामान्यपणे 24 तासांत खाते पुन्हा सुरू होते. मात्र, यास जास्त वेळही लागू शकतो. खातेधारक, बँक अकाउंटचा प्रकार यानुसार वेळ कमी-जास्त लागू शकतो.   
8) जेव्हा बँक खाते पुन्हा सुरू होते तेव्हा काही बँका खात्यावर एक व्यवहार करण्यास सांगतात. तो तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन करू शकता.

खाते बंद होऊ नये म्हणून काय कराल?

24 महिने म्हणजेच 2 वर्षातून एकदा तरी खात्यावर व्यवहार करा. त्यामुळे खाते बंद होणार नाही. खात्यातून पैसे काढा, जमा करा किंवा खात्यातील रक्कम तपासली तरी खाते बंद होणार नाही. युपीआय, एटीएम, बँक ब्राँच किंवा नेट बँकिंगद्वारे व्यवहार केला तरी चालेल. फोन नंबर, पत्ता, किंवा इतर KYC मध्ये काही बदल झाल्यास बँकेला त्वरित कळवा. खाते जेव्हा निष्क्रिय असते तेव्हाही त्यावर व्याज मिळते तसेच बँक शुल्क कापून घेत असते. बंद खाते सुरू करण्यासाठी कोणतेही शुल्क लागू होत नाही. शुल्क मागितल्यास आरबीआय लोकपालकडे तक्रार करू शकता.