Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Pay Direct: ऑनलाईन एलआयसीचा प्रीमिअम कसा भरायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

LIC Premium Pay Direct

Image Source : www.licindia.in

How to Pay LIC Premium Online: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसीने ग्राहकांना ऑनलाईन प्रीमिअम भरता यावा. यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या विविध पर्यायांमधून तुमच्या सोयीने ऑनलाईन प्रीमिअम भरू शकता.

एलआयसी ही भारतातील सर्वांत मोठी इन्शुरन्स कंपनी आहे. इन्शुरन्स म्हटले की, लोकांना खूप काही कळत नाही. पण एलआयसी मात्र कळते. तर गावागावांत पोहोचलेल्या एलआयसीचे अनेक ग्राहक आहेत. हे ग्राहक एलआयसी एजंट किंवा एलआयसीच्या ब्रान्चमध्ये जाऊन प्रीमिअम भरतात. पण या ग्राहकांसाठी एलआयसीने विविध प्रकारच्या पेमेंट मेथड उपलब्ध करून दिल्या आहेत.

एलआयसीने उपलब्ध करून दिलेल्या प्रीमिअम भरण्याच्या विविध पर्यायांपेकी ऑनलाईन पद्धत सर्वाधिक बेस्ट मानली जाते. ऑनलाईन पेमेंट जलद आणि लगेच होते. यामुळे आता एलआयसीचे बरेच ग्राहक ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यास प्राधान्य देतात. ऑनलाईन पमेंट पद्धतीमध्येही दोन-तीन वेगवेगळे प्रकार आहेत. त्याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

एलआयसी वेबसाईटवरून प्रीमिअम भरणे

एलआयसीचे पॉलिसीधारक कंपनीच्यी वेबसाईटवरून प्रीमिअम भरू शकतात, यासाठी तुम्ही सर्वप्रथम कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या. तिथे ऑनलाईन सर्व्हिसेस पोर्टलमधून Pay Premium Online यावर क्लिक करा. इथे तुम्हाला प्रीमिअम भरण्यासाठी दोन पर्याय दिसतील.

  • Pay Direct (Without Login)
  • Through Customer Portal


यापैकी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करून प्रीमिअम भरू शकता. तुम्ही जर वरीलपैकी Pay Direct (Without Login) हा पर्याय निवडला तर खालीलप्रमाणे स्टेप्स फॉलो करा.

तुम्हाला जर एलआयसीच्या पोर्टलवर स्वत:ची माहिती रजिस्टर्ड न करता प्रीमिअम भरायचा असेल तर तुम्ही Pay Direct (Without Login) हा पर्याय निवडून खाली दिल्याप्रमाणे तीन प्रकारचे पेमेंट्स करू शकता.

  • प्रीमिअम पेमेंट्स / रिवायव्हल (Premium Payment/Revival)
  • लोन रिपेमेंट (Loan Repayment)
  • लोन इंटरेस्ट रिपेमेंट (Loan Interest Repayment)

लॉगिन करून प्रीमिअम भरणे

एलआयसीच्या वेबसाईटवर लॉगिन करून पेमेंट करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जावे लागेल. तुम्ही जर यापूर्वी एलआयसीच्या वेबसाईटवर तुमचे खाते ओपन केले नसेल तर त्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड करावे लागेल. रजिस्टर्ड करण्यासाठी Sign Up यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरा. रजिस्टर्ड करण्यासाठी तुमच्याकडे पॉलिसीचा क्रमांक, प्रीमिअमची रक्कम (टॅक्स वगळता), जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि ईमेल इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे.

एकदा का तुम्ही वेबसाईटवर रजिस्टर्ड केले की, तुम्ही तुमच्या खात्यातून कधीही प्रीमिअम भरू शकता. लॉगिन केल्यानंतर Online Payments या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन प्रीमिअम भरू शकता.

एलआयसी अ‍ॅपमधून प्रीमिअम भरणे

गुगल स्टोअरमधून एलआयसीचे अ‍ॅप डाऊनलोड करून तुम्ही प्रीमिअम भरू शकता. प्ले स्टोअरवर LIC Pay Direct App, LIC Pay Direct App आणि My LIC हे तीन अ‍ॅप उपलब्ध आहेत. अशाप्रकारे एलआयसी पॉलिसीधारक वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन प्रीमिअम भरू शकतात.