Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fake QR Code: पैसे पाठवताना खोटे आणि चुकीचे QR Code कसे ओळखायचे?

How to identify fake qr code

Fake QR Code: क्यूआर कोडद्वारे पेमेंट करणे किंवा पैसे पाठवणे ही ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली एक चांगली सुविधा आहे. पण या सुविधेचा सायबर गुन्हेगारांकडून चुकीचा वापर होत असल्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. ते होऊ नये यासाठी चुकीचा किंवा फेक क्यूआर कोड कसा ओळखायचा याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Fake QR Code: डिजिटल आणि ऑनलाईन बॅंकिंगमुळे आता प्रत्येक जण आपल्या स्मार्ट मोबाईलमधून क्यूआर कोड स्कॅन करतो आणि लगेच पेमेंट करून मोकळा होतो. या नवीन अत्याधुनिक सुविधेमुळे कोणतेही व्यवहार करताना कॅश बाळगण्याची गरज लागत नाही. बॅंकेत किंवा एटीएममध्ये जाऊन पैसेसुद्धा काढावे लागत नाही. पण बऱ्याचवेळा हे क्यूआर कोड चुकीचे किंवा फेक अकाउंटला जोडलेले असल्यामुळे बऱ्याच जणांची आर्थिक फसवणूक होत आहे. अशावेळी क्यूआर कोड स्कॅन करताना ग्राहकांनी नेमकी काय काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत आपण सविस्तपणे जाणून घेणार आहोत.

क्यूआर कोडद्वारे पेमेंट करणे किंवा पैसे पाठवणे ही ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली एक चांगली सुविधा आहे. यामुळे अनेकांना पैसे खिशात ठेवावे लागत नाहीत. तसेच रोख पैसे नसतानाही त्यांनी एखादी वस्तू विकत घेता येते. हा बदल फक्त डिजिटल बॅंकिंग आणि क्यूआर कोडमुळे होऊ शकला आहे. पण बऱ्याचवेळा हे क्यूआर कोड चुकीचे किंवा लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरले जात असल्यामुळे बऱ्याच जणांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण क्यूआर कोडमुळे अनेकांचे व्यवहार सुरळितपणे आणि जलद होत होते. पण काही सायबर चोरट्यांकडून लोकांची आर्थिक फसवणूक होत असल्यामुळे क्यूआर कोडचा वापर करणे सुरक्षित आहे की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच स्कॅन करत असलेला क्यूआर कोड बरोबर आहे की नाही, हे सुद्धा ओळखणे गरजेचे झाले आहे.

बऱ्याचवेळा ग्राहक खरेदी केल्यानंतर तिथे असलेला क्यूआर कोड स्कॅन करून त्यावर लगेच पैसे पाठवतात. पण या क्यूआर कोडच्या माध्यमातून आता बऱ्याच जणांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच बद्रिनाथ-केदारनाथ मंदिर परिसरात देणगी देण्यासाठी क्यूआर कोडचे स्टिकर लावण्यात आले होते. हे क्यूआर कोड मंदिर देवस्थान समितीने लावले नसल्याचे मंदिराच्यावतीने स्पष्ट करण्यात आले होते. अशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने लोकांची फसवणूक झाल्याचे दिसून आले. यामुळे क्यूआर कोड स्कॅन करताना ज्या व्यक्तीला किंवा संस्थेला पैसे पाठवायचे आहेत; त्याची खातरजमा करूनच ते पैसे पाठवणे गरजेचे आहे.

बऱ्याचवेळा क्यूआर कोड स्कॅन केला की, नावाचे साधर्म्य असलेल्या कंपनीचे नाव दिसून येते. उदाहरणार्थ, तुम्ही गुगवरून एखादी वस्तू विकत घेतली आहे. त्या वस्तुचे पेमेंट करण्यासाठी तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करता. तेव्हा त्यावर gooogle.com किंवा googgle.com असे नाव येते आणि पेमेंट करणाऱ्या व्यक्तीला ते गुगलचेच खाते आहे; असा भास होतो आणि ते पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करतात. पण मुळात ते google.com असे असायला हवे. हे आपल्या त्यावेळी लक्षात येत नाही. अशाप्रकारे अनेक नामांकित कंपन्यांच्या नावाने लोकांची फसवणूक केली जात आहे. अशाप्रकारे फसवणूक होऊ नये. यासाठी क्यूआर कोडद्वारे पैसे पाठवताना तिथे नाव काय येते. खाते तेच आहे का? याबद्दल बोलून घ्यावे आणि खात्री पटल्यानंतर त्यावर पैसे पाठवावे. फसवणूक टाळण्याचा हा सर्वात साधा आणि सोप्पा पर्याय आहे.