सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund-PPF) योजनेंतर्गत कोणत्याही भारतीय नागरिकाला खाते सुरू करता येऊ शकते. तसेच प्रत्येक महिन्याला काही रक्कम भरून पीपीएफ खाते सुरू ठेवता येऊ शकते. पीपीएफ खाते कोणत्याही अधिकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. यामध्ये दहमहा गुंतवणूक करून कर्मचारी भविष्यातील जमापुंजी जमा करू शकतात. सध्या या खात्यावर 7.1% इतका व्याजदर मिळत आहे. पीपीएफ खाते हे दीर्घकाळासाठी उघडले जाते. या योजनेवर मिळणारे व्याज हे चक्रवाढ पद्धतीने मिळते. पण काही अडचणींमुळे तुम्हाला 15 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बंद करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. ते करण्यासाठी काय करावे लागते. याबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोत.
5 वर्षांनी खाते बंद करणे शक्य
वैयक्तिक जीवनात काही समस्या उद्भवल्यास पीपीएफ खाते मुदतीपूर्वी बंद करता येते. पण यासाठी किमान 5 वर्ष सातत्याने हे खाते सक्रीय असणे गरजेचे आहे. सदर खाते बंद करण्यासाठी खातेदाराकडे पुढीलप्रमाणे ठोस कारण असले पाहिजे.
- वैयक्तिक किंवा कुटुंबाशी संबंधित वैद्यकीय अडचण किंवा मेडिकल इमर्जन्सीमधून पैशांची गरज लागल्यास
- वैयक्तिक किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज पडल्यास
- खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, खात्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी ते बंद करता येते. यासाठी 5 वर्षांचा नियम लागू नाही.
- खाते मुदतीपूर्वी बंद केले तर त्यातून पैसे काढल्यास त्यावर 1% व्याज वजा केले जाते.
खाते बंद कसे बंद करायचे?
पीपीएफ खाते मुदतीपूर्वी बंद करायचे असल्यास खातेदाराला प्रत्यक्ष बँकेत भेट देऊन लेखी अर्ज द्यावा लागतो. सोबत फॉर्म C भरून सबमिट करावा लागतो. तसेच अधिकाऱ्यांना खाते बंद करण्याचे कारण सांगावे लागेल. त्याचे पुरावे सोबत जोडावे लागतील. जसे की पीपीपी खाते पासबुक, वैद्यकीय कारणामुळे खाते बंद करत असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे सर्टिफिकेट, उच्च शिक्षणासाठी खाते बंद करत असल्यास प्रवेश प्रमाणपत्र, फी च्या पावत्या सादर कराव्या लागतील. तसेच खाते धारकाचा मृत्यू झाल्यास मृत्यूचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून खाते बंद करण्याची प्रक्रिया केली जाते.
Source: www.zeebiz.com