कोणत्याही बँकेत खाते उघडायच्याआधी आपल्याला त्या बँकेचा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांचे प्राॅडक्ट काय आहेत आणि ते सुविधा कशी देतात. मार्केटमध्ये त्यांचा किती बोलबाला आहे. या सर्व गोष्टींविषयी आपल्याला माहिती काढून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता किंवा त्या बॅंकेत जावून त्यांच्या सेवांविषयी विचारपूस करू शकता. असे केल्यास, तुमचा बराच फायदा होवू शकतो. कारण, मार्केटमध्ये खूप बँका आहेत ज्या चांगल्या सेवा प्रदान करत आहे. त्यामुळे खाते उघडायच्याआधी तुम्ही बँकांच्या सेवांची किंवा प्राॅडक्टची तुलना करून खाते उघडल्यास फायद्याचे ठरू शकते.
Table of contents [Show]
बँकेचा इतिहास पाहा
तुम्हाला घरबसल्या माहिती काढायची असल्यास, तुम्ही बँकांच्या वेबसाईटवर जावून आमच्याविषयी या विभागात जावून माहिती काढू शकता. त्यामध्ये बँकेने आत्तापर्यंत केलेल्या सर्व कामांचा लेखाजोखा असतो. तसेच, बँक कोण कोणत्या सुविधा देते याविषयी सर्व माहिती या विभागात अपडेट केलेली असते. त्यामुळे बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळू शकते. परस्पर बँकेत जावून माहिती काढायची म्हटल्यावर थोडं वेळखाऊ ठरू शकते. त्यामुळे ज्या बँकेविषयी माहिती काढायची आहे. ती ऑनलाईनच सर्च करावी लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला त्या बँकेची माहिती मिळू शकते.
बँकेविषयी गुगल'वर करा सर्च
बॅंकेची सेवा कशी आहे हे पाहायचे असेल तर तुम्ही या विषयी गुगल'वर सर्च करू शकता. तेथे तुम्हाला बॅंकेविषयी कोणी तक्रार केली असल्यास ते पाहायला मिळू शकते. याचबरोबर अन्य वेबसाईट किंवा बॅंकेच्या वेबसाईटवरही लोकांचा बॅंकेविषयी काय प्रतिसाद आहे, हे पाहायला मिळू शकते. तुम्ही बॅंकेची सेवा किंवा इतर गोष्टींची माहिती ही ट्रीक ट्राय करून काढू शकता.
चार्जेस बघून उघडा खातं!
बँकांचे अनेक प्रकार आहेत जसे की, सेंट्रल बॅंक, कमर्शिअल बॅंक, को- आॅपरेटीव्ह बॅंक, पेमेंट्स बॅंक, शेड्युल्ड बॅंक, नाॅन शेड्युल्ड बॅंक, स्माॅल फायनान्स बॅंक यापैकी सामान्यांचा जास्त संबंध कमर्शिअल बॅंकेसोबतच येतो. त्यामुळे या बॅंकेत खाते उघडण्याआधी त्यांचे चार्जेस माहिती करून घेणे आवश्यक आहे. कारण, प्रत्येक बॅंकेचा चार्ज वेगळा राहू शकतो. त्यामुळे चार्जेस बघून उघडले तर तुमचा फायदाच आहे. तसेच, त्या बॅंकेत कोणते खाते उघडता येते, हेही पाहणे आवश्यक आहे.
या चार्जेसची करा तुलना
बॅंकेत खाते उघडायचे म्हटल्यावर मेंटेनन्स व एटीएमचा ही चार्ज द्यावा लागतो. एखाद्यावेळी तुमचे बॅलन्स कमी झाले तर त्यासाठी ही तुम्हाला पैसे द्यावे लागतात. याचबरोबर ओव्हरड्राफ्टचा चार्जही द्यावा लागतो. जास्त व्यवहार केला तर त्याचे ही चार्जेस द्यावे लागतात. त्यामुळे बॅंकेत खाते उघडताना. ते खाते कोणते आहे म्हणजेच बचत खाते आहे की चेकींग खाते आहे. हे पाहणे ही गरजेचे आहे. मग त्यानुसार त्यांचे चार्जेस आणि तुम्हाला मिळणारे फायदे ही तुम्ही चेक करू शकता. कारण, बचत खाते असल्यास, त्यावर तुम्हाला व्याज नक्कीच मिळेल.
सुविधा काय आहेत?
बॅंक ऑनलाईन कोणत्या सेवा देते याची माहिती मिळवणे ही महत्वाचे आहे. कारण, आजच्या डिजिटल युगात सर्व गोष्टी ऑनलाईन आहेत. त्यामुळे ऑनलाईनमध्ये कोणत्या सुविधा आहेत. त्याचे काही चार्जेस आहेत का हेही विचारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कस्टमर सेवा असल्यास तिची वेळ काय आहे, याविषयी माहिती मिळवावी लागेल. कारण, सध्या बॅंक पैसे ट्रान्सफर असो की, एटीएम, क्रेडिट कार्ड, लोन या सगळ्या सुविधा ऑनलाईन देते. त्यामुळे याविषयी तुम्हाला सर्व माहिती काढावी लागेल.
ह्या सर्व गोष्टी करून झाल्यावर, तुम्हाला ज्या बॅंकेत सर्वांत जास्त सुविधा आणि टेन्शनचे काम कमी वाटत असेल. अशा बॅंकेत तुम्ही तुमचे खाते उघडू शकता. या माहितीचा तुम्हाला बॅंकेत खाते उघडण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.