Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How to choose Stocks while Investing in Shares: जाणून घ्या, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना स्टॉक कसे निवडावे

How do I decide what stock to invest in

How to choose Stocks while Investing in Shares: सध्या शेअर्स मार्केटला चांगले दिवस आले आहे. शेअर्सबाबत लोक चौकशी करताना दिसत आहेत. तसेच यामध्ये शेअर्सची गुंतवणूक करण्यासाठी अनेक नवनवे लोक पुढे येत आहेत, खास या लोकांसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करताना स्टॉक कसे निवडावे, याविषयी सांगणार आहोत.

How to choose Stocks while Investing in Shares: तुम्ही जर शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी नवीन असाल, तर तुम्हाला साहजिक की प्रश्न पडला असेल की, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सर्वप्रथम स्टॉक कसे निवडावे? तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत. चला, तर मग याविषयी सविस्तरपणे जाणून घ्या.

कंपनीचा अभ्यास करा (Study the Company)

सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक वॉरेन बफेट म्हणतात, "तुम्हाला समजत नसलेल्या कंपनीमध्ये कधीही गुंतवणूक करू नका." कारण माहिती नसलेल्या कंपनीत शेअर्स लावणे म्हणजे तुम्ही पैसे गमावण्याच्या मार्गावर असतात. तुम्ही माहिती असलेल्या कपंनीचे स्टॉक खरेदी केले, तर तुम्हाला कोणत्याही वेळी खरेदी, होल्डिंग किंवा विक्री करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यास मदत होते. त्यामुळे, कोणत्याही कंपनीचा अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला समजणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

कंपनीचे मुल्य पहा (See Company Values)

'कंपनी मुल्य' मध्ये कंपनीमध्ये तुलना केली जाते. कोणती कंपनी सर्वोत्तम नफा कमाविते याकडे पाहिले जाते. बहुतांश नवीन गुतवणूंकदार प्राईस-कॅश फ्लो, प्राईस-बुक, प्राईस-कमाई आणि प्राईस-सेल्स रेशिओवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे  कंपनीचे मुल्य लक्षात घेऊनच, स्टाॅक खरेदी  करणे फायदयाचे ठरेल. 

योग्य वेळी गुंतवणूक करा (Invest at the Right Time)

जेव्हा मार्केट कोसळलेले असते, त्यावेळी गुंतवणूक करणे फायदेशीर असते. कारण त्यावेळी बुडणाऱ्या हात देत असल्याने, त्याची चर्चा मोठी होते. त्यामुळे लोक शेअर्सबदद्ल चर्चा करायला सुरूवात करतात. नेमकी त्याचवेळी गुंतविलले शेअर्सची विक्री करणे हे महत्वाचे असते. 

कमी किंमतीचे शेअर्स घेणे टाळा (Avoid Buying Underpriced Stocks)

 नेहमी यशस्वी गुंतवणूकदार हे कधी कमी किंमतीच्या किवा छोट्या शेअर मध्ये गुंतवणूक करत नाही. या प्रकारचे शेअर बहुतांश पैकी खरेदी-विक्रीसाठी कमी प्रमाणात दिसतात. या शेअर्सचा परफार्मन्स खराब असतो. अशा परिस्थितीत गुंतवणूक करणे टाळा.

तंज्ञाचा सल्ला घ्या (Consult an Expert)

शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तंज्ञाचा सल्ला घेणे, कधी ही फायदेशीर असते. त्याच्याशी चर्चा करून तुमची आर्थिक उद्दिष्टे काय आहेत, हे निश्चित करा, मग योग्य गुंतवणूक करा.