NPS Balance Check: भारतातील वाढती महागाई पाहिल्यास, भविष्याचा विचार करुन आत्तापासूनच गुंतवणूक सुरू करणे योग्य ठरते. त्यामुळे NPS मध्ये पैसे गुंतवल्यास, त्याचा वापर तुम्हाला रिटायरमेंटनंतर एक ठराविक पेन्शन रक्कम मिळण्यास होऊ शकते. या पेन्शन योजनेत 18 ते 60 वयोगटातील कोणती ही व्यक्ती खाते उघडून बचत सुरू करू शकते. पण, बचत केल्यानंतर, ती नियमित चेक करणे आपली जबाबदारी आहे. ती वेगेवगळ्या माध्यमातून आपल्याला चेक करता येते. तसेच, NPS देखील गुंतवणुकदारांच्या पत्त्यावर वार्षिक आधारानुसार बॅलन्सचे डिटेल्स पाठवत असते. मात्र, तुम्हाला बॅलन्ससह अपडेट राहायचे असल्यास, खालील पद्धतींचा वापर करुन तुम्ही घरबसल्या ऑनलाईन बॅलन्स चेक करू शकता.
Table of contents [Show]
एनएसडीएल पोर्टलद्वारे चेक करा NPS चा बॅलन्स
- सर्वात आधी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (NSDL) अधिकृत पोर्टलवर जा https://nsdl.co.in/
- युझर आयडी म्हणून तुमचा पर्मनंट रिटायरमेंट अलॉटमेंट नंबर (PRAN), खात्याचा पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
- लॉग इन केल्यानंतर 'Transaction Statement' सेक्शनअंतर्गत 'Holding Statement' या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमच्या खात्याच्या स्क्रीनवर बॅलन्स दिसेल.
NSDL मोबाईल अॅपद्वारे चेक करा NPS चा बॅलन्स
- अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या लिंकवरून NSDL मोबाइल अॅप डाउनलोड करा.
- अॅपवर, तुमच्या NPS खात्यात लॉग इन करण्यासाठी त्याच स्टेप्स फाॅलो करा.
- एकूण NPS होल्डिंग व्हॅल्यू त्यांच्या टियर I आणि टियर II खात्यांमध्ये गुंतवणूकदारांच्या होल्डिंगसह स्क्रीनवर दिसेल.
UMANG अॅपद्वारे चेक करा NPS चा बॅलन्स
- UMANG अॅप डाउनलोड करा आणि NPS सेवांसाठी सर्च करा.
- NPS पर्याय निवडा आणि तुमचा संबंधित CRA निवडा.
- पुढे, 'Current Holding' पर्याय निवडा आणि लॉग इन करण्यासाठी तुमचा PRAN आणि पासवर्ड टाका.
- लॉग इन केल्यानंतर, संबंधित खात्याची माहिती युझर्सला अॅक्सेस करता येईल.
NPS खात्याचा बॅलन्स पाहा SMS द्वारे
- तुमच्या NPS-नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9212993399 मिस्ड कॉल द्या.
- यानंतर नोदणीकृत नंबरवर तुमच्या NPS खात्यातील बॅलन्सच्या माहितीचा SMS तुम्हाला प्राप्त होईल.