Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एलआयसी पॉलिसी अंतर्गत क्लेम न केलेली रक्कम कशी तपासायची

lic

दावा न केलेली एलआयसी (LIC) रक्कम किंवा पॉलिसीची कोणतीही थकबाकी असल्यास तुम्ही एलआयसीकडे फक्त तुमचे पॉलिसी तपशील शेअर करून ते ऑनलाइन तपासू शकता.

भारतीय आयुर्विमा महामंडळच्या (Life Insurance Corporation LIC) पॉलिसीअंतर्गत बऱ्याचवेळा दावा (Claim) न केलेली रक्कम पडून असते. या रकमेसाठी अनेक दिवस लोकांकडून क्लेम केला जात नाही. अशावेळी एलआयसीकडे (LIC) क्लेम न केलेली रक्कम (unclaimed amount under LIC policy)आहे की नाही हे कसे तपासाल? तुमच्याकडे कोणतीही क्लेम न केलेली एलआयसी (LIC) रक्कम किंवा पॉलिसीची कोणतीही थकबाकी असल्यास एलआयसीकडे (LIC) फक्त पॉलिसी तपशील शेअर करून ते ऑनलाइन तपासू शकता. मृत्यू दावा (Death claim), परिपक्वता दावा, नुकसानभरपाईचे दावे किंवा प्रीमियम परताव्यासाठी असे दवे करता येतील. 

क्लेम न केलेली रक्कम तपासण्यासाठी कागदपत्र 

  • एलआयसी पॉलिसी क्रमांक
  • पॉलिसीधारकाचे नाव
  • जन्मतारीख
  • पॅन कार्ड

क्लेम न केलेली रक्कम कशी शोधायची

जर कोणत्याही एलआयसी (LIC) पॉलिसीधारकाला किंवा लाभार्थीला हे जाणून घ्यायचे असेल की त्यांच्या एलआयसी (LIC) पॉलिसी अंतर्गत कोणतीही रक्कम विमा कंपनीकडे क्लेम न करता पडून आहे की नाही, यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब करा. 

एलआयसीच्या (LIC) संकेतस्थळाला भेट द्या 
मग कस्टमर सर्व्हिस पर्यायात जाऊन Unclaimed policy क्लिक करा.
आवश्यक सर्व तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा क्लिक करा.
जर रक्कम असेल तर एकूण रक्कम उघड केली जाईल आणि तुम्ही योग्य KYC आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यावर दावा करू शकता. 

क्लेम किंवा हक्क नसलेल्या खात्यांबद्दलचे नियम 

10 वर्षांहून अधिक काळ कोणताही पैसा क्लेम न करता सोडल्यास, सर्व रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये (Senior Citizen Welfare Fund - SCWF) हस्तांतरित केली जाते. अशा निधीचा वापर नियमानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्यासाठी केला जातो. सरकारी अधिसूचनेनुसार 10 वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीला (SCWF) क्लेम न केलेल्या रकमा हस्तांतरित करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या संस्थांच्या कंपन्यांना सूचित केले जाते. त्यानुसार, सर्व विमाधारकांनी खातरजमा करावी की पॉलिसीधारकांच्या क्लेम न केलेल्या रकमा ताब्यात ठेवल्या जातील आणि या परिपत्रकानुसार प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार देय तारखेपासून 10 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवल्या जातील. दावा न केलेल्या रकमा, दहा वर्षे पूर्ण झाल्यावर, अधिसूचनेच्या तरतुदींनुसार हाताळल्या जातील. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (Insurance Regulatory and Development Authority -IRDAI ) 2016 च्या परिपत्रकानुसार, विमाधारकांनी ठेवलेल्या परंतु पॉलिसीधारकांना किंवा लाभार्थ्यांना देय असलेली कोणतीही रक्कम देय तारखेपासून किंवा रकमेच्या सेटलमेंटच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर क्लेम न केलेली रक्कम मिळवता येते. 

पॉलिसीला क्लेम न केलेले केव्हा म्हटले जाते?

पॉलिसीधारक किंवा लाभार्थी SCWF मध्ये रकमेच्या हस्तांतरणाच्या तारखेपासून 25 वर्षांच्या कालावधीसाठी पॉलिसी अंतर्गत देय रकमेचा क्लेम करता येऊ शकेल. वित्त कायदा, 2015 च्या कलम 126 नुसार SCWFला हस्तांतरित केल्यापासून 25 वर्षांच्या आत कोणताही दावा न केल्यास IRDAI च्या मास्टर परिपत्रकानुसार, निधी केंद्र सररकारकडे जाईल.