• 02 Oct, 2022 07:48

उत्तम पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी या टिप्स लक्षात घ्या

उत्तम पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी या टिप्स लक्षात घ्या

Portfolio : अनेक तज्ज्ञ गुंतवणूकदारांनी परिभाषित केल्याप्रमाणे गुंतवणूक म्‍हणजे तुमचा निरूपयोगी पैसा योग्य ठिकाणी बचत करण्याचा मार्ग. तुम्हाला आज तुमच्या मेहनतीचे मोल मिळत आहे. योग्यरित्या बचत केल्यास भविष्यात योग्य लाभ मिळू शकतात.

पैसा हे असे साधन आहे, जे असल्यास काहीही करता येऊ शकते. कंपन्या सूचीबद्ध होण्यामागील कारण म्हणजे मूल्यांकनामधून मिळालेला लाभांश व नफ्याच्या बदल्यात लोकांकडून निधी उभारणे. बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला विकसित होण्यासोबत तुमचा पैसा सुरक्षित ठेवण्याबाबत हमी देऊ शकणाऱ्या व्यवसायावर विश्वास ठेवावा लागतो.

गुंतवणुकीबाबत मुलभूत माहिती

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड वाढत आहे. बाजारातील वाढत्‍या भांडवलामधून हा ट्रेंड अधोरेखित होतो. पण गुंतवणूकदार अगदी बारकाईने गुंतवणूक करतात. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे खर्च व बचत.खरेतर लक्षात घेण्याजोगे आहे की, गुंतवणूकीमध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट असते आणि लाभांबाबत दाखवल्या जाणाऱ्या अपेक्षांप्रमाणे स्थिती नेहमीच नसते.पैशांचे योग्य व्यवस्थापन हे शेअर बाजारातील प्रवास सुरू करण्याच्या दिशेने स्मार्ट गुंतवणूकदाराचे पहिले पाऊल आहे.

जोखीम समजून घ्या

गुंतवणूक करताना त्यात दडलेली जोखीम समजल्यास आपण गुंतवणुकीसाठी मार्गांबाबत चर्चा करू शकतो. बहुतांश ब्रोकर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यापार केल्या जाणाऱ्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. अननुभवी गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूकीसाठी संबंधित साधने किंवा मालमत्तांसह सुरुवात करणे उत्तम. या उद्देशासाठी ब्ल्यू-चिप स्टॉक्स सर्वोत्तम आहेत. हे भक्कम कंपन्यांचे शेअर्स आहेत. बहुतांश अननुभवी गुंतवणूकदार निष्क्रीय गुंतवणुकीसह सुरुवात करतात. ज्यामुळे त्यांना बाजाराचे निरीक्षण करण्यास जोखीम नियंत्रणात ठेवण्यास आणि मानवी भावनांमध्ये वाहून न जाता योग्य विचार करण्यास वेळ मिळतो.

गुंतवणूक क्षेत्रामधील तंत्रज्ञान प्रगती

पारंपारिक गुंतवणूक पद्धती बऱ्याच लोकांसाठी गोंधळात टाकणाऱ्या व आवाक्याबाहेर असायच्या. गुंतवणूक सल्लागार बहुतांश वेळा आपल्या मतांबाबत ठाम नसायचे आणि उच्च-मूल्य ठेवींसाठी गरजेने संभाव्य गुंतवणूकदारांमध्ये शंकेचे वातावरण निर्माण केले.सक्रियपणे गुंतवणूक केलेल्या त्यांच्या गुंतवणुकांबाबत माहीत असल्यामुळे त्यांच्या पर्यायांबाबत जाणीव होती. दुसरीकडे निष्क्रीय गुंतवणूकदारांना पैसे कुठे व कसे गमावले हे देखील समजले नाही.

अॅप्सच्या माध्यमातून पोर्टफोलिओचे व्यवस्थापन

आर्थिक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या आविष्काराने तंत्रज्ञानप्रेमी गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. हा आविष्कार निष्क्रीय गुंतवणूकदारांसाठी वरदान ठरत आहे. आधुनिक गुंतवणूक साधने उपलब्ध होणाऱ्या मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून पोर्टफोलिओंचे सर्वोत्तम व्यवस्थापन करण्यामध्ये मदत करतात. आज आवश्यक ठेवी व मार्जिन्स खूपच कमी आहेत, सर्वोत्तम इंटरफेसेस नवीन गुंतवणूक सुरू करणाऱ्या गुंतवणूकदारांना ट्रेड टर्मिनल्समधून सुलभपणे ब्राऊज करण्याची सुविधा देतात. अनेक‍ संकेतक आहेत, जे व्यवहारांच्या विश्लेषणासाठी प्राइस चार्टसवर वापरता येऊ शकतात. तसेच विशिष्ट तर्कानुसार व्यापार करण्यासाठी ऑटोमेटेड अल्गोरिदम्स देखील वापरता येऊ शकतात, ज्यामुळे मानवी हस्तक्षेपाच्या घटना कमी होण्यास मदत होते.

सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोर्टफोलिओमध्ये विविधता

ब्ल्यू-चिप स्टॉक्स सुरक्षित गुंतवणूकांसाठी उत्तम मार्ग आहेत, पण लक्षात ठेवा की लाभासोबत जोखीम देखील असते. प्रत्येक गुंतवणूकदाराने त्यांच्यासाठी उपयुक्त साधने ओळखण्यासाठी त्यांचे रिस्क प्रोफाइल परिभाषित करणे गरजेचे आहे. उच्च नफा मिळण्याच्या शक्यतेसह जोखीम घटक देखील वाढतो. मालमत्तेमध्ये अधिक वाढ करण्यासाठी जोखीम घटकांसह तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचे काही मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.

  • लार्ज-कॅप स्टॉक्सचे म्युच्युअल फंड्स 
  • लार्ज व मिड-कॅप स्टॉक्सचे डायरेक्ट शेअरहोल्डिंग 
  • कर्ज बाजाराची साधने जसे लाँग-टर्म बॉण्ड्स 
  • मनी मार्केट इन्स्ट्रूमेण्ट्स व शॉर्ट-टर्म बॉण्ड्स

आर्थिक संस्था व व्यावसायिक दलाल व्यवहार करत असल्यामुळे भांडवल बाजाराची साधने मनी मार्केट साधनांच्या तुलनेत सुरक्षित आहेत. दीर्घकाळापर्यंत महागाईच्या तुलनेत सर्वोत्तम उत्पन्न मिळवून देणारे कोणतेही साधन सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ही एक संकल्पना आहे. ज्यावर मोठ- मोठे गुंतवणूकदार त्यांच्या फंड्समध्ये सुरक्षितपणे बहुविध वाढ करण्यासाठी विश्वास ठेवतात.

गुंतवणुकीसाठी निवडण्यात आलेली साधने संबंधित जोखीम घटकांव्यतिरिक्तही साध्या आकर्षून घेणाऱ्या शुल्कांवर आधारित असतात. फंड्समधून मिळणारा नफा तपासण्यासाठी गुंतवणूक करण्यायोग्य मालमत्तांवरील शुल्क व कर दायित्व त्यांच्या उत्पन्नांसह संतुलित असणे गरजेचे असते. तसेच लहान रक्कमेची विभागणी करणे देखील अवघड असते. म्हणून काही मालमत्तांसह सुरूवात करत कालांतराने अधिक फंड्ससह विविधता आगणे गुंतवणूकीचा योग्य मार्ग आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर अनेक मालमत्ता विभाग आहेत, पण प्रत्येकाला त्याबाबत सखोलपणे माहित नाही. कोणत्याही मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना उत्तमरित्या संशोधन नेहमीच लाभदायी ठरते आणि हीच बाब शेअर बाजारामधील गुंतवणूकीच्या बाबतीत देखील आहे. बाजारातील बहुतांश गुंतवणूकांमध्ये नुकसान होण्यामागील कारण म्हणजे भावनिक होऊन गुंतवणूक केलेली असते किंवा मूळ मालमत्तेबाबत योग्य माहितीचा अभाव असतो.