Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How to Block Debit Card: डेबिट कार्ड गहाळ किंवा चोरीला गेल्यास ब्लॉक कसे करायचे?

How to Block Debit Card

How to Block Debit Card: तुमच्याकडून डेबिट कार्ड गहाळ झाल्यास किंवा ते चोरीला गेल्यास लगेच ब्लॉक करावे लागते. नाहीतर त्याचा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तो टाळण्यासाठी डेबिट कार्ड कसे ब्लॉक करता येते, हे आपण जाणून घेणार आहोत.

How to Block Debit Card: डेबिट कार्डच्या मदतीने ग्राहकाला बँकेत न जाता ही पैसे काढता येतात. त्याचबरोबर डेबिट कार्डच्या मदतीने ऑनलाईन ट्रॅान्सॅक्शनदेखील करता येतात किंवा एखाद्या दुकानातून पैसे न देता खरेदीही करता येते. तसे डेबिट कार्डचे खूप सारे फायदे आहेत. यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष स्वत:जवळ रोख रक्कम ठेवण्याची गरज पडत नाही.

डेबिट कार्डचे जसे अनेक फायदे आहेत; तसेच त्याचे काही तोटे सुद्धा आहेत. त्यातील पहिला तोटा म्हणजे डेबिट कार्ड गहाळ झाल्यास किंवा चोरीला गेल्यास त्याचा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तसेच तुमचे बँक खाते धोक्यात येऊ शकते. पण तुम्ही घाबरू नका. तुमच्याकडून डेबिट कार्ड गहाळ झाल्यास ते ब्लॉक करण्याचे म्हणजेच त्यातून आर्थिक व्यवहार बंद करण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

डेबिट कार्ड ब्लॉक कसे करायचे?

डेबिट कार्ड चोरीला गेल्यास किंवा गहाळ झाल्यास ते ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ब्लॉक करता येते. काही बँका टोल फ्री क्रमांकावर फोन करून आणि एसएमएसच्या मदतीनेही कार्ड ब्लॉक करतात.  

ऑफलाईन डेबिट कार्ड असे ब्लॉक करा

तुमचे डेबिट कार्ड चोरीला गेल्यास किंवा त्या कार्डवरून तुमच्या परोक्ष काही व्यवहार झाले असल्यास तुम्ही ज्या बँकेचे कार्ड होते. त्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्याच्या मदतीने डेबिट कार्ड ब्लॉक करू शकता.

ऑनलाईन डेबिट कार्ड असे ब्लॉक करा

  • सर्वप्रथम तुमचे नेट बँकिंग किंवा मोबाईल अॅप सुरू करा.
  • नेट बँकिंगमध्ये लॉगिन केल्यानंतर डेबिट/क्रेडिट कार्डमध्ये जा.
  • इथे Block the Card हा पर्याय निवडा.
  • कार्ड ब्लॉक करण्याचे ठोस कारण द्या.
  • तुमची रिक्वेस्ट सबमिट करा.
  • रिक्वेस्ट स्विकारून प्रोसेस पूर्ण करण्यासाठी बँक ओटीपी किंवा प्रोफाईल पासवर्डची मागणी करेल.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुमचे डेबिट कार्ड काही क्षणात ब्लॉक होईल.

SMS द्वारे डेबिट कार्ड असे ब्लॉक करा

डेबिट कार्ड एसएमएस द्वारेही ब्लॉक करता येते. कार्डधारकाला फक्त एक एसएमएस बँकेला पाठवाला लागतो. हा क्रमांक बँकेकडून पुरवला जातो. बँकेने दिलेल्या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवल्यानंतर काही मिनिटांमध्ये तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक केले जाते. त्याचा मॅसेजही बँकेकडून पाठवला जातो. प्रत्येक बँकेची ही सेवा वेगवेगळी असू शकते. तसेच प्रत्येक बँकेचे Customer Number ही वेगवेगळे असतात.

फोन बँकिंग

काही बँका ग्राहकांना फोन बँकिंगची सुविधाही देतात. ग्राहकांना बँकेत न जाता किंवा ऑनलाईन ट्रान्सॅक्शन न करता फक्त फोनच्या मदतीने काही सेवा पुरवल्या जातात. या सेवाद्वारे तुम्ही तुमचे गहाळ झालेले डेबिट कार्ड ब्लॉक करू शकता.

डेबिट कार्ड ब्लॉक कधी करतात?

  • एखाद्याचे डेबिट कार्ड गहाळ झाल्यास
  • कार्ड चोरीला गेल्यास
  • अनोळख्या एटीएममधून पैसे काढताना पिन क्रमांक बदलण्याची सूचना आल्यास


बँकेच्या नियमानुसार जेव्हा एखादा कार्डधारक डेबिट कार्डचा वापर करताना 3 वेळा चुकीचा पिन क्रमांक टाकतो. तेव्हा ते डेबिट कार्ड 24 तासासाठी आपोआप ब्लॉक होते. 24 तासानंतर मात्र पुन्हा सुरू होते.

Source: www.groww.in