Protect Your Smart TV from Cyberattacks: क्वचितच कोणी विचार केला असेल की टिव्ही देखील हॅक होऊ शकतो? आतापर्यंत फक्त स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि लॅपटॉप हॅक झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या, मात्र आता स्मार्ट टीव्ही हॅक झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. गुजरातमध्ये स्मार्ट टीव्ही हॅक करून एका जोडप्याच्या खासगी क्षणांचे रेकॉर्डिंग केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे, तर दिल्लीमध्ये ड्रॉईंग रुमधील चर्चा स्मार्ट टिव्हीने रेकॉर्ड केली आणि त्यावरुन कुटुंबीयांनी धमकी येण्यास सुरुवात झाली. हैद्राबादमध्येही अशाच काही घटना घडल्या घरातील सर्व गोष्टी व्हिडीओ रेकॉर्ड होत राहिल्या आणि टिव्ही हॅक झाल्यावर त्या फुटेजवरुन धमक्या येणे, पैशांची मागणी अशा गोष्टी घडू लागल्या, मग पोलिसात तक्रार करण्यात आली. मात्र हे स्मार्ट टिव्ही हॅक होण्याचे प्रकार सध्या वाढू लागले आहेत. 
  
इंटरनेट कनेक्शन असलेली जगातील सर्व उपकरणे हॅक केली जाऊ शकतात. इथे मुद्दा स्मार्ट टिव्हीचा आहे, मग स्मार्ट म्हणजे इंटरेट आलेच, अर्थात हॅकर्स स्मार्ट टिव्ही देखील हॅक करू शकतात. काही टिव्ही कॅमेरासह येतात तर काही येत नाहीत सर्व स्मार्ट टीव्ही कॅमेरासह येत नाहीत. कॅमेरा ऑनच्या बायडिफॉल्ट सेटींगमुळे कॅमेरा ऑनच राहतो आणि बॅकएंडला त्याचे फुटेज जमा होत राहते. तर व्हॉईस रेकॉर्डींग किंवा व्हॉईस कमांड पर्यायाचेही असेच आहे, त्यात ऑलवेज ऑन हे मोड सुरू राहते आणि मग हॅकर्सना मोकळे रान मिळते.तसेच, स्मार्ट टिव्हीमध्ये विविध अॅप डाऊनलोड करताना त्यात मालवेअर जाऊन पुढे टिव्ही हॅक होऊ शकतो.
स्मार्ट टिव्ही हॅक होऊ नये म्हणून काय करावे? (What to do to prevent smart TV from being hacked?)
तुमच्या स्मार्ट टीव्हीमध्ये इनबिल्ट कॅमेरा असल्यास, तो सेटिंग्जमधून बंद किंवा डिसेबल करा किंवा कॅमेरावर काळी टेप लावून झाकून ठेवा. सेटिंग्जमध्ये जा आणि मायक्रोफोनचा ऑलवेज ऑन पर्याय बंद करा. कंपनीने दिलेल्या अपडेटकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर टिव्ही स्मार्टफोनप्रमाणे अपडेट करत रहा. तुमच्या स्मार्ट टिव्हीमध्ये पैसे व्यवहाराशी निगडीत अॅप्स इन्स्टॉल करू नका. तसेच, माहिती नसलेले, थर्ड पार्टी स्टोअरवरुन अॅप्सही डाऊनलोड करू नका.टिव्हीला पेनड्राईव्ह कनेक्ट करताना त्यात व्हायरस नाही ना हे तपासून घेत जा. यासह, स्मार्ट टीव्हीच्या सिस्टम सेटिंग्जच्या ऍक्सेसिबिलिटी विभागात जाऊन स्मार्ट सिक्युरिटी चालू करा. भविष्यात टिव्हीसाठीही अँटी व्हायरस बनेल, त्यावेळी फारशी चिंता करावी लागणार नाही, असे डिजिटल मार्केटींग तज्ज्ञ राहुल शर्मा यांनी सांगितले.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            