भारतात अनेक OTT (Over-The-Top) प्लॅटफॉर्म आहेत जे इंटरनेटद्वारे व्हिडिओ स्ट्रीमिंग करत आहेत. या प्लॅटफॉर्म्सच्या वाढत्या लोकप्रियतेने थिएटर्सची प्रेक्षकसंख्या कमी केली. आपण पाहिले की कोरोनाव्हायरस सर्व देशभर पसरला असतानाही, या प्लॅटफॉर्म्सने त्यांचा व्यवसाय वाढवला कारण संकटाच्या काळात हा मनोरंजनाचा सर्वात सुरक्षित प्रकार होता. पण तुम्हाला माहिती आहे का हे प्लॅटफॉर्म्स कमाई कशी करतात? तेच आपण आज पाहणार आहोत.
Table of contents [Show]
OTT प्लॅटफॉर्म काय आहे? What is OTT Platform?
ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर विविध चित्रपट आणि कार्यक्रम पाहू शकतो. यासाठी कोणत्याही केबल कनेक्शनची आवश्यकता नसते. एक काळ असा होता की केबल टीव्ही खूप लोकप्रिय होता. पण आजकाल, आजच्या पिढीला कोणत्याही केबल कनेक्शनची गरज नाही कारण त्यांना टीव्ही केबलपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिक मनोरंजनाचा कंटेंट मिळतो. या प्लॅटफॉर्मने थिएटरची लोकप्रियता लुटली आहे यात शंका नाही. लोक थिएटरमध्ये जाण्यापेक्षा ऑनलाइन चित्रपट, सिरीज पाहणे पसंत करतात.
OTT प्लॅटफॉर्म पैसे कसे कमवतात? How OTT platforms earn money?
सब्सक्रिप्शन द्वारे (Through Subscription)
या प्लॅटफॉर्मवर जास्त ट्रॅफिक असते, त्यामुळे लोकांना चित्रपट पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन मिळवावे लागते. त्यामुळे, बरेच वापरकर्ते लोकप्रिय किंवा आवडीचा कंटेंट पाहण्यासाठी सब्सक्रिप्शन विकत घेतात. अशाप्रकारे लोकांनी घेतलेल्या सब्सक्रिप्शन द्वारे OTT प्लॅटफॉर्म वरील कंपन्या पैसे कमवतात.
जाहीरातींच्या माध्यमातून (Through Advertisements)
असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत जे विनामूल्य आहेत आणि काही तुम्हाला सब्सक्रिप्शन घेतल्यानंतर मिळतात. ओटीटी प्लॅटफॉर्मसवर कंटेंट पाहताना तुम्हाला काही जाहीराती दिसतात. या जाहीरातींच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्म्स पैसे कमवतात.
खरेदी किंवा भाड्याने पर्याय
यूट्यूबमध्ये, बहुतेकदा आपण चित्रपटांच्या खाली हा पर्याय पाहतो. त्यामुळे तेथे तुम्ही कोणतेही विशिष्ट चित्रपट खरेदी करण्यासाठी पैसे देऊ शकता.
या प्लॅटफॉर्मन्सचा कंटेंट स्रोत कोणता? From where does it get content sources?
निर्मात्यांना पैसे देतात
समजा, कोणताही चित्रपट चित्रपटगृहात आला तर OTT प्लॅटफॉर्म निर्मात्यांशी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर चित्रपट स्ट्रिम करण्यासाठी बोलतात. ते पैसे देऊन निर्मात्यांकडून हक्क घेतात. ते निर्मात्यांकडून ऑनलाइन स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतात.
पूर्ण चित्रपट विकत घेतात
दुसरे म्हणजे, निर्मात्याकडून पूर्ण चित्रपट मिळविण्यासाठी ते पैसे गुंतवतात. कोरोना महामारीमध्ये आपण पाहिले आहे की थिएटर असूनही "दिल बेचारा" थेट हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. तर, हे प्लॅटफॉर्म चित्रपटासाठी संपूर्ण रक्कम देऊन निर्मात्यांकडून मूळ चित्रपट विकत घेतात.
स्वतः कंटेंट तयार करतात
या प्लॅटफॉर्ममध्ये, अॅमेझॉन ओरिजनल, नेटफ्लिक्स ओरिजनल इ. ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतःला चित्रपट निर्मितीत गुंतवून ते स्वतः चित्रपट तयार करतात.
लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्स
नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार, व्हूट, झी फाइव्ह, जिओ टिव्ही