Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Organic farming : सेंद्रिय शेतीचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतोय? ‘ही’ आहेत कारणे…

Organic farming

भारतातील शेतीमधील कृत्रिम रसायनांवरील अवलंबित्व कमी करणे आणि जमिनीची सुपीकता आणि पीक आरोग्य वाढविण्यासाठी नैसर्गिक प्रक्रियांना चालना देणे हे सेंद्रिय शेतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे जमिनीचा पोत तर सुधारतोच पण त्यासोबत चांगले उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळते आहे. शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट देखील सेंद्रिय शेतीमुळे पाहायला मिळते आहे.

सध्या देशभरात शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होताना दिसतायेत. सेंद्रिय शेती हा त्यातलाच एक प्रकार. किफायतशीर आणि शाश्वत कृषी पद्धत म्हणून सेंद्रिय शेतीला महाराष्ट्रात लक्षणीय लोकप्रियता मिळाली आहे.

भारतातील शेतीमधील कृत्रिम रसायनांवरील अवलंबित्व कमी करणे आणि जमिनीची सुपीकता आणि पीक आरोग्य वाढविण्यासाठी नैसर्गिक प्रक्रियांना चालना देणे हे सेंद्रिय शेतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे जमिनीचा पोत तर सुधारतोच पण त्यासोबत चांगले उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळते आहे. शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट देखील सेंद्रिय शेतीमुळे पाहायला मिळते आहे.

कमी इनपुट खर्च (Reduced Input Costs)

सेंद्रिय शेती ही कीड आणि रोग व्यवस्थापनाच्या नैसर्गिक पद्धतींवर अवलंबून असते, ज्यामुळे महागड्या रासायनिक कीटकनाशके आणि खतांची गरज कमी होते. यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होते आहे. सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, सोनखत आणि पालापाचोळा यांपासून बनवलेले खत वापरले जाते. या खताची निर्मिती कशी केली जावी यासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या कार्यशाळा देखील घेण्यात येतात.

महाराष्ट्र सरकारने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना आणि अनुदाने सुरू केली आहेत. हे कार्यक्रम सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण देतात.

मातीचे आरोग्य संवर्धन (Soil Health Enhancement)

सेंद्रिय शेती पद्धती, जसे की पीक बदलत राहणे, पीक काढल्यानंतर तेथील पालापाचोळा याचे नियोजन, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाला प्रोत्साहन अशा बाबींचा समावेश आहे. यामुळे शेतजमिनीचे आरोग्य तर उत्तम राहतेच, सोबतच सिंचन आणि खतावरील खर्च देखील आटोक्यात येतो. यामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्पादन तर मिळतेच परंतु त्यासोबत जमिनीची निगा राखली जाते आणि जमिनीतील पोषक तत्वांमध्ये वाढ होते.

पाण्याचा कमी वापर (Lower Water Consumption)

अनेक सेंद्रिय शेती तंत्र जलसंवर्धनावर लक्ष केंद्रित करतात, जसे की मल्चिंग (आच्छादन)  आणि ठिबक सिंचन. महाराष्ट्रासारख्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशात, या पद्धती पाण्याचा वापर आणि संबंधित खर्च कमी करण्यास मदत करू शकतात. अहमदनगर, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा झाला आहे.

बियाण्यांची बचत (Seed Saving)

सेंद्रिय शेतकरी अनेकदा बियाणे जतन करतात आणि प्रत्येक हंगामात बियाण्यांची देवाणघेवाण करतात, ज्यामुळे दरवर्षी बियाणे खरेदी करण्याची गरज कमी होते आणि बियाणांच्या साठेमारीतूनही शेतकऱ्यांची सुटका होते. या पद्धतीमुळे केवळ पैशांची बचत होत नाही तर पारंपारिक पिकांच्या वाणांचे जतन करण्यासही प्रोत्साहन मिळते.

सध्याच्या काळात ग्राहक अधिकाधिक सेंद्रिय उत्पादनाची मागणी करत आहेत कारण त्यामागे आरोग्य फायदे आणि पर्यावरणीय स्थिरता हे मुख्य कारण आहे. सेंद्रिय उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे मालाला चांगला बाजारभाव मिळू लागला आहे. तुम्हांला देखील सेंद्रिय शेतीबाबत अधिक माहिती हवी असेल तर आजच नजीकच्या कृषी केंद्रात जाऊन याबाबत माहिती घ्या. तुमच्या परिसरात याबाबत काही योजना किंवा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे का याची माहिती घ्या. जमिनीची निगा राखण्यासोबतच तुम्हांला तुमच्या शेतातून अधिक चांगले उत्पन्न घेण्याचा हा मार्ग तुम्हांला आर्थिक सुबत्तता मिळवून देऊ शकतो.