कोणालाही नवीन मोबाईल घ्यायचा असेल, सर्वप्रथम गुगुलवर, वेगवेगळ्या शॉपिंग साईटवर किंवा ई-कॉमर्स साईटवर तर कुठे जास्तीचा डिस्काऊंट (Smartphone Discount Offer) मिळतो का? ते पाहिलं जातं. किंवा कोणत्या कंपनीचा सेल सुरू असेल तर त्याला पसंती दिली जाते. अर्थात, स्वस्तात मस्त वस्तू मिळवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.
पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? एवढ्या महागड्या मोबाईलवर डिस्काऊंट द्यायला मोबाईल कंपन्यांना कसे काय परवडते. त्यांना यातून फायदा होतो की नाही. तर याचं उत्तर असं आहे की, कोणतीही कंपनी स्वत:चा फायदा झाल्याशिवाय त्याचे उत्पादन किंवा निर्मिती करत नाही. स्मार्ट फोनच्याबाबतीतही असंच आहे. स्मार्ट फोनची निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्या फोनची प्रॉडक्शन कॉस्ट (Smart Phone Production Cost) आणि इतर खर्च पकडून त्यातून आपला फायदा काढून घेते आणि मग डिस्काऊंट ऑफर (Discount Offer) किंवा सेलमध्ये त्याची विक्री करतात. इथे डिस्काऊंट म्हणजे कंपन्या आपल्या नफ्यातील काही भाग कमी करतात. तो कमी करण्यामागेही कंपनीकडे कारणं असतात. जसे की, एखाद्या प्रॉडक्टचे उत्पादन अधिक झाले असेल तर, त्या वस्तुला उठाव देण्यासाठी कंपनीकडून डिस्काऊंट ऑफर दिली जाते.
बऱ्याच कंपन्या डिस्काऊंट ऑफर देताना NO COST EMI किंवा विशिष्ट प्रकारच्या बॅंकेचे क्रेडिट कार्ड वापरले तर एवढा कॅशबॅक देणार असे सांगितले जाते. पण अशा ऑफर्समधून कंपन्या ग्राहकांना मुळात आहे त्या किमतीलाच मोबाईल विकत असतात. उदाहरणार्थ, एखादी कंपनी NO COST EMI वरती मोबाईल विकताना त्यावरील डिस्काऊंट काढून मूळ किमतीत तो मोबाईल विकत असते. तर डिस्काऊंट लावलेल्या मोबाईलची किंमत अगोदरच वाढवून लावलेली असते.
त्याचप्रमाणे काही मोबाईल विक्रेते मोबाईलच्या किमतीतच व्याज आकारतात आणि ग्राहकाला त्या किंमतीवर NO COST EMI ची सुविधा देतात. जसे की, 50 हजार रुपयांच्या मोबाईलची किंमत अगोदरच 55 किंवा 60 हजार करून ठेवली जाते. आणि ग्राहकांकडून 55 किंवा 60 हजारू रूपयांचा EMI घेतला जातो.
अशाप्रकारे, मोबाईल तयार करणाऱ्या कंपन्यांपासून ते किरकोळ विक्रेते आपापल्यापरीने स्वत:चा फायदा करून घेत असतात. फायनान्सच्या दुनियेत याला ‘स्मार्ट मार्केटिंग’ (Smart Marketing) म्हटले जाते.