राष्ट्रीय शेअर बाजाराच्या एसएमई मंचावर आज होम्सफाय रियल्टीच्या शेअरने जबरदस्त एंट्री घेतली. होम्सफाय रियल्टीचा शेअर एनएसई-एसएमई मंचावर 275 रुपयांवर लिस्ट झाला. आयपीओतील इश्यू प्राईसच्या तुलनेत शेअरमध्ये 39.62 रुपयांचा नफा झाला. आज पहिल्याच दिवशी गुंतलणूकदारांनी जोरदार कमाई केली.
होम्सफाय रियल्टीचा शेअरने आज इंट्रा डेमध्ये 288 रुपयांपर्यंत वाढला होता. त्यात 46% वाढ झाली. होम्सफाय रियल्टीच्या आयपीओ योजनेला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. त्यामुळे ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा शेअर तेजीत होता. रविवारी 1 जानेवारी 2023 रोजी ग्रे मार्केटमध्ये होम्सफाय रियल्टीचा शेअर प्रीमियम 24 रुपयांवर गेला होता. त्यामुळे शेअर बाजारात जोरदार लिस्टिंग होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
आज सकाळी राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत होम्सफाय रियल्टीच्या शेअरची घंटानाद करुन नोंदणी करण्यात आली. तो 39.62 रुपयांच्या प्रीमियमसह 275 रुपयांवर सूचीबद्ध झाला. आयपीओसाठी प्रती शेअर 197 रुपयांचा भाव निश्चित करण्यात आला होता. ज्या भाग्यवान गुंतवणूकादारांना आयपीओमध्ये शेअर प्राप्त झाले त्यांनी आज पहिल्याच दिवशी प्रति शेअर 78.05 रुपयांचा नफा कमावला.
होम्सफाय रियल्टीचा एसएमई मंचावरील आयपीओ 21 ते 23 डिसेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. यासाठी 197 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता. कंपनीने शेअर्स विक्रीतून 15.86 कोटींचे भांडवल उभारले. एका लॉटसाठी किमान 118200 रुपयांची गुंतवणूक आवश्यक होती.