वर्षभरापासून गृहकर्जाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. नवीन कर्जदारांसाठी हे चिंतेचे कारण ठरले आहे. कारण वाढत्या ईएमआयमुळे (EMI) प्रत्येक कर्जदाराचे आर्थिक गणित बिघडले आहे. तुलनेने भाड्याच्या घरात राहणे नागरिकांना परवडत आहे. कारण घर खरेदी केल्यास एका मोठ्या रकमेची तडजोड करावी लागते. त्यानंतर प्रत्येक महिन्याला ईएमआय भरावा लागतो तो वेगळा. यामुळे अनेक जणांना आर्थिक ओढाताण होत आहे. अर्थात ज्यांचे आर्थिक उत्पन्न चांगले आहे. ते निभावून नेत आहेत. पण ज्यांची आर्थिक क्षमता बेताची आहे. त्यांना हा मेळ साधणे अवघड जात आहे. त्यामुळे अनेक जण घर खरेदी करण्याऐवजी भाड्याने राहण्यास पसंती देत आहेत. या दोन्हीचे काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत. ते आपण समजून घेणार आहोत.
Table of contents [Show]
मासिक भाडे परवडते
गृहकर्जाचा हप्ता महाग झाल्यामुळे तुमचे मासिक देय वाढते. यामुळे आर्थिक गरजांचे नियोजन तुम्हाला अडचणीचे ठरते. याउलट तुमचे घरभाडे स्थिर असल्यामुळे तुमच्या खिशाला ते परवडते. म्हणून भाड्याचे घर घेण्याकडे अनेकांचा कल असतो.
लवचिकता
घर भाड्याचे असल्यास तुम्हाला कामानिमित्ताने स्थलांतर करावे लागल्यास सोपे होते. तुम्ही कुठल्याही वैयक्तिक कारणास्तव तुमच्या निवासाचे ठिकाण हलवू शकता. तुम्ही स्वतः घरमालक असल्यास तुम्हाला हे करणे सहज शक्य होत नाही.
मालमत्ता कर
भाडेकरू म्हणून तुम्हाला मालमत्ता कर भरावा लागत नाही. घरमालकांसाठी दरवर्षी तो एक मोठा खर्च असतो. मालमत्ता कराचा समावेश तुमच्या एकूण मासिक घरभाड्यात केला जातो.
देखभाल खर्च नाही
जेव्हा तुम्ही घर भाड्याने घेता तेव्हा तुम्हाला दुरुस्ती किंवा देखरेखीसाठी पैसे खर्च करावे लागत नाही. ती संपूर्ण घरमालकाची जबाबदारी असते.
नो डाऊन पेमेंट
घर भाड्याचे असल्यास डाऊन पेमेंटची आवश्यकता नसते. जी घर खरेदी करू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी अडचणीची गोष्ट आहे. कारण खूप मोठी रक्कम यावेळी डाऊन पेमेंट म्हणून भरावी लागते.
फोरक्लोजरचा धोका नाही
घरभाडे देत असल्यामुळे फोरक्लोजरचा धोका नसतो. गृहकर्ज असल्यास घरमालकांसाठी ती एक चिंतेची बाब असते; कारण लोन काही वर्षांनंतर फोरक्लोज केल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
कमी आर्थिक जबाबदारी
जेव्हा तुम्ही घर भाड्याने घेता तेव्हा तुम्ही घरमालकांचा विमा, HOA फी किंवा घर खरेदी संबंधित इतर खर्च करावे लागणार नाहीत.
घर खरेदी करावे की, भाड्याच्या घरात राहावे! हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. घर खरेदी करण्याचेही अनेक फायदे आहेत. मात्र तुम्ही जर कर्ज काढून घर खरेदी करत असाल तर तुमच्या आयुष्यातील एक मोठा काळ हे कर्ज फेडण्यात जाऊ शकतो. यामुळे जर गृहकर्ज घेऊन घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर वरील गोष्टींचा नक्की विचार करा.