Home Lone Offer: मेट्रो आणि देशातील इतरही छोट्या शहरांत स्थावर मालमत्ता विकत घेणाऱ्या महिलांचा टक्का वाढत आहे. महिला स्वत: नोकरी व्यवसाय करून घर घेण्यास पसंती देत आहेत. एकल महिला घर खरेदीमध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे श्रीराम हाऊसिंग फायनान्सने मदर्स डे च्या निमित्ताने महिलांसाठी गृहकर्जावर खास ऑफर आणली आहे. महिला जर गृहकर्ज घेत असेल तर प्रोसेसिंग फी (प्रक्रिया शुल्क) वर 50% सवलत देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. तब्बल 25 लाखांपर्यंतच्या कर्जावर ही सूट मिळू शकते.
SHFL ACE अॅपवरुन करा अप्लाय
मदर्स डे साजरा करण्यासाठी कंपनीने ही ऑफर खास महिलांसाठी आणली आहे. कंपनीच्या डायरेक्ट टू कस्टमर अॅप SHFL ACE द्वारे जे ग्राहक गृहकर्जासाठी अर्ज करतील त्यांना या ऑफरचा फायदा घेता येईल. अँड्रॉइड प्लेस्टोअरवर हे अॅप उपलब्ध असून याद्वारे गृहकर्जासाठी अर्ज करता येईल. महिलांना गृहकर्ज अधिक सुलभ उपलब्ध व्हावे यासाठी ही ऑफर श्रीराम हाऊसिंग फायनान्सने आणली आहे.
संपूर्ण एक महिन्यासाठी ऑफर
मदर्स डे साठीची ही ऑफर संपूर्ण मे महिला लागू असणार आहे. “एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी ही ऑफर आणताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्यातर्फे हा महिलांचा सन्मान आहे. कुटुंबाचं भवितव्य सुरक्षित करण्याबरोबरच महिला स्वत:ही सक्षम व्हाव्यात. त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी आम्ही काम करत आहोत. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा फायदा घ्यावा”, असे श्रीराम फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी सुब्रमण्यम यांनी म्हटले.
ज्या महिलांचे क्रेडिट रेकॉर्ड चांगले आहे त्या महिलांना 25 लाख रुपयापर्यंतच्या गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्कात 50% सूट मिळेल. श्रीराम फायनान्सकडे सध्या एकूण गृहकर्जापैकी 5% कर्ज हे महिलांचे आहे. प्रमुख शहरांमध्ये जेथे कमावत्या महिलांसाठी संख्या जास्त आहे तेथे श्रीराम फायनान्सद्वारे कर्ज देण्यात आली आहेत, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले.