बँक ऑफ इंडियानं (Bank of India) जून महिना सुरू होताच ग्राहकांना धक्का दिलाय. 1 जून 2023 रोजी सर्व एमसीएलआर (Marginal Cost of Funds Based Lending Rate) वाढवण्यात आलाय. 0.05 टक्क्यांची वाढ सध्या करण्यात आलीय. एका वर्षासाठी दर 8.60 टक्क्यांवरून 8.65 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. 1 जूनपासून हा नवा दर लागू होणार आहे. बँक ऑफ इंडियाकडून एमसीएलआर वाढवल्याचा परिणाम थेट कर्जावर होणार आहे. बँकेकडून गृहकर्ज (Home Loan) घेतलेल्या सर्व ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. कारण त्यांना वाढीव दरानुसार हप्ते भरावे लागणार आहेत. त्याचबरोबर नव्या ग्राहकांना वाढलेल्या व्याजावरच कर्ज घ्यावं लागणार आहे. झी बिझनेसनं याविषयीचं वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
बँक ऑफ इंडिया एमसीएलआर - कसे असतील दर?
- ओव्हरनाइट - 7.95 टक्के
- 1 महिना एमसीएलआर - 8.15 टक्के
- 3 महिने एमसीएलआर - 8.25 टक्के
- 6 महिने एमसीएलआर - 8.45 टक्के
- 1 वर्ष एमसीएलआर - 8.65 टक्के
- 3 वर्ष एमसीएलआर - 8.85 टक्के
एमसीएलआर म्हणजे नेमकं काय?
एमसीएलआर म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट हा प्रत्यक्षातला किमान व्याजाचा दर आहे. याच्या खाली कोणतीही बँक ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाही. बँकांना त्यांचा ओव्हरनाइट, एक महिना, तीन महिने, सहा महिने, एक वर्ष आणि दोन वर्षांचा असे विविध एमसीएलआर दर महिन्याला जाहीर करणं बंधनकारक आहे.
एमसीएलआर वाढल्यास काय?
एमसीएलआर वाढल्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज यांसारख्या किरकोळ किंमतीशी संबंधित कर्जावरचं व्याजदरदेखील वाढतं. एचडीएफसीनं दर वाढवल्यामुळे नवीन आणि जुन्या ग्राहकांसाठी ईएमआयवरचा व्याजदर जास्त महाग होणार आहे. फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवर ही वाढ लागू असते मात्र फिक्स्ड व्याजदरावर ती लागू होत नाही. त्याचबरोबर एमसीएलआर वाढल्यानंतर ईएमआय फक्त रीसेट तारखेलाच वाढेल.
आयसीआयसीआय बँकेनंही अपडेट केले दर
आयसीआयसीआय बँकेने 3 महिन्यांपर्यंत एमसीएलआरमध्ये 0.15 टक्के कपात केल्याचं दिसतंय. 6 महिन्यांपासून ते 1 वर्षापर्यंत एमसीएलआरमध्ये 0.05-0.10 टक्के वाढ झालीय.
आयसीआयसीआय बँक एमसीएलआर - कसे असतील दर?
- ओव्हरनाइट - 8.35 टक्के
- 1 महिना एमसीएलआर - 8.35 टक्के
- 3 महिने एमसीएलआर - 8.40 टक्के
- 6 महिने एमसीएलआर - 8.75 टक्के
- 3 वर्ष एमसीएलआर - 8.85 टक्के